What exactly are the 'Red', 'Orange', 'Green' and 'Yellow' alerts issued by the Meteorological Department
महाराष्ट्र

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांत रेड अलर्ट

मुंबई : हवामान विभागाकडून पुणे, सातारा आणि रत्नागिरीत आज (17 जून) रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील 2-3 दिवस कोकणात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. मराठवाड्यातील परभणी, जालना आणि हिंगोलीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाण्यात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्ध्यांत देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत