ST bus
महाराष्ट्र

धक्कादायक : रात्री गावाकडे जाण्यासाठी ST बस नव्हती म्हणून तरुणांनी चक्क…

लातूर : शेळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवून नेण्याची धक्कादायक घटना घडली.  लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी बस स्थानकातील ही घटना आहे. गावाकडे जाण्यासाठी रात्री उशिरा एसटी बस नव्हती म्हणून बस स्थानकातून एसटी पळवून नेण्याचा प्रकार घडला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रात्री उशिरा गावात जाण्यासाठी एसटी नसल्यानं दारूच्या नशेत शेळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवून नेली. एसटी पळवताना लाईटच्या दोन खांबांना देखील जोराची धडक बसली. त्यामुळे विजेच्या तारा तुटून खाली पडल्या. शिवाय विजेचा खांब देखील कोसळला आहे. पहाटेच्या सुमारास बस स्थानकात झोपलेल्या बसच्या चालक आणि वाहकाला एसटी जाग्यावर नसल्याचं समजताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले.

औराद पोलिसांनी शोध घेतल्यानंतर शेळगी गावात एसटी बस सापडली. तरुणांनी एसटी बस पळवून नेताना झालेल्या अपघातामुळे एसटीचं २५ हजारांचं नुकसान झालं आहे. मात्र, एसटी खात्याकडून कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात नसल्यानं गुन्हाच नोंद झालेला नाही. एवढा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर एसटी विभागाकडून गुन्हा नोंदवण्यात आला नाही. एसटीचा गलथानपणा या निमित्तानं चव्हाट्यावर आला आहे. नेमकी एसटी कोणी पळवून नेली? एसटी पळवणाऱ्यांना पोलीस प्रशासन व एसटी खातं पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतंय का, या प्रश्नाची चर्चा परिसरात रंगली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत