truck carrying glass crashed

मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रकला भीषण अपघात, 3 मजूरांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र मुंबई

पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वडवली गावाजवळ काच वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून मुंबईच्या दिशेने जात असताना अचानक स्टेरिंग लॉक झाल्याने कंटेनराला मागून धडक जोरात धडक बसली. यामध्ये 3 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जखमींना तलासरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रात्री 3: 30 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. अपघात घडताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी अपघात स्थळी धाव घेत 3 जणांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत