Minister Shambhuraj Desai
महाराष्ट्र

कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करावा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : सातारा जिल्ह्यातील कसणी गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील गाव आहे. या गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. मंत्रालयात मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मंत्री देसाई म्हणाले की, कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. वन्य प्राण्यांमुळे या गावातील शेती, पशुधन, मनुष्यहानीबाबत होणाऱ्या नुकसानीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीला सौर ऊर्जा कुंपण द्यावे. या गावाच्या पुनर्वसनाबाबत वन मंत्र्यासमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालक रामानुजन, सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, सहायक वनसंरक्षक गणेश पाटोळे उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत