5 lakh immediate assistance to family of person killed in tiger attack
महाराष्ट्र

वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना ५ लाख रूपयांची तात्‍काळ मदत

चंद्रपूर : चंद्रपूरच्‍या इंदिरानगर येथील रहिवासी पुरूषोत्‍तम बोपचे (४० वर्ष) हे फुले वेचण्‍यासाठी वनामध्‍ये गेले असता वाघाने त्‍यांच्‍यावर हल्ला केला व त्‍यात त्‍यांचा जागीच मृत्‍यु झाला. या दुर्देवी घटनेनंतर महाराष्‍ट्राचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोपचे यांच्‍या परिवाराला शासन नियमानुसार मदत करण्‍याचे निर्देश दिले. त्‍यानुसार वनविभागाने बोपचे यांच्‍या कुटूंबास ५ लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्री मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते प्रदान केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यावेळी देवराव भोंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी कारेकर, माजी उपमहापौर राहूल पावडे, माजी नगरसेविका चंद्रकला सोयाम, दिनकर सोमलकर, डॉ. गिरीधर येडे, मनोज पोतराजे, पप्‍पु बोपचे, प्रलय सरकार, आशिष ताजने व त्‍या प्रभागातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यापुढील मदतीची रक्‍कम या कुटूंबाला लवकरात लवकर देण्‍याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी यावेळी अधिका-यांना दिले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत