15-day curfew in Maharashtra from tomorrow
महाराष्ट्र

महाराष्ट्रात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी, काय राहणार सुरु जाणून घ्या…

महाराष्ट्रात रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आह. त्यासोबतच राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या आरोग्य सुविधांची कमतरता देखील जाणवू लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात आज राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राज्यात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी

  1. उद्या संध्याकाळपासून राज्यात १४४ कलम लागू
  2. अनावश्यक येणे जाणे पूर्ण बंद.
  3. कोणत्याही व्यक्तीला अतिआवश्यक काम नसेल तर बाहेर पडू देऊ नका.
  4. आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील
  5. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच सुरु राहतील.
  6. सार्वजनिक वाहतूक सुरु राहील, ती केवळ जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांसाठीच असेल
  7. औषधे, लस उत्पादक, अत्यावश्यक सेवा देणारे, मास्क वितरक, वैद्यकीय लोक, जनावरांशी संबंधित दवाखाने उघडी राहतील
  8. पत्रकारांनाही सूट असेल.
  9. पेट्रोल पंप सुरु राहतील
  10. बांधकामं जिथे सुरु आहेत, तिथेच कर्मचाऱ्यांची राहण्याची सुविधा करा. त्यांना वाहतूक करु देऊ नका.
  11. हॉटेल, रेस्टॉरंटवर पूर्वीप्रमाणे निर्बंध, होम डिलिव्हरी सुरु

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत