education institutes
शैक्षणिक

शैक्षणिक संस्था २१ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने होणार सुरू

करोनामुळे गेल्या जवळपास पाच महिन्यांपासून बंद असलेल्या शैक्षणिक संस्था २१ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे कौशल्य प्रशिक्षणही २१ सप्टेंबरपासून सुरू करण्यास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने इयत्ता नववी ते १२ वीचे वर्ग आणि शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी ते एच्छिक आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दोन वर्गामध्ये अंतर ठेवणे, उपकरणांची देवाणघेवाण न करणे, स्वतंत्र वेळा, शारीरिक अंतराचा नियम पाळणे आणि वर्गखोल्यांचे र्निजतुकीकरण करणे आदी मार्गदर्शक तत्त्वे आरोग्य मंत्रालयाने आखून दिली आहेत.

लहान मुलांसाठी ऑनलाइन वर्गच सुरू राहणार आहेत. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांचे मान्यतापत्र घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळा संक्रमणक्षेत्राच्या बाहेर आहेत त्या सुरू करण्याची परवानगी असेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत