राजस्थान : राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील ब्यावर येथील एका खासगी डेंटिस्टच्या दवाखान्यात एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडितेने ब्यावर शहर पोलिस ठाण्यात आरोपी डेंटिस्ट आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ब्यावर पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजी पीडित तरुणी राजसमंदच्या भीमा शहरातून दातांवर उपचार करण्यासाठी ब्यावर येथील चंपानगर येथील डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये आली होती. जेथे पीडितेने दंतचिकित्सकाला टॉयलेटबद्दल विचारले, तेव्हा त्याने तिला क्लिनिकमध्येच त्याच्या बेडरूममध्ये पाठवले. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जेव्हा ती त्या खोलीत गेली, तेव्हा डेंटिस्टनेही तिच्या मागे जाऊन खोलीचा दरवाजा बंद केला. यानंतर डेंटिस्टने खोलीत तिच्यावर बलात्कार केला.
पीडितेने सांगितले की, जेव्हा ती खोलीतून बाहेर पडायला लागली, तेव्हा डेंटिस्टचा दुसरा मित्र तिथे आला. त्यानंतर डेंटिस्ट खोलीतून बाहेर पडला आणि त्याच्या साथीदाराने खोली बंद करून तिच्यासोबत गैरवर्तन केले. बलात्कारानंतर दोन्ही आरोपींनी तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्यामुळे ती अनेक दिवस गप्प राहिली. सोमवारी हिंमत एकवटून पीडितेने तिच्या कुटुंबीयांना न सांगता आरोपीविरुद्ध ब्यावर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ब्यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील मेहरदा म्हणाले की, पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कलम 164 अन्वये तिचा जबाब घेण्यात येईल. मंगळवारीही पीडितेला बोलावण्यात आले. याबाबत तपास सुरू आहे. पीडितेचा जबाब घेतल्यानंतरच आरोपींना अटक केली जाईल.
पत्नीने प्रायव्हेट पार्टवर लाथ मारल्यामुळे पतीने गमावले पुरुषत्व, त्यानंतर उचलले टोकाचे पाऊल…
अभिनेत्री रश्मिरेखा ओझाची गळफास घेऊन आत्महत्या, मनोरंजनविश्वात खळबळ




