The two brutally murdered a 15-year-old vegetable seller
क्राईम देश

भयंकर! हॉर्नला प्रतिसाद न दिल्यामुळे अल्पवयीन मुलीने केला मूकबधिर व्यक्तीचा खून

छत्तीसगड : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे रविवारी एका दिव्यांग व्यक्तीचा एका १६ वर्षीय मुलीने चाकूने भोकसून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना आझाद चौक पोलिस स्टेशन हद्दीत कंकालीपारा भागात घडली, याबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक (पश्चिम) डीसी पटेल यांनी माहिती दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय मुलगी दुचाकीवरून जात होती, यावेळी सायकलवर एक मूकबधिर व्यक्ती चालली होती. दरम्यान, मुलीने हॉर्न वाजवला परंतु, सायकलवरील व्यक्ती मूकबधिर असल्याने त्याने तिच्या हॉर्नला कोणताही प्रतिसाद दिला नाही. मात्र, यामुळे संतापलेल्या अल्पवयीन मुलीने मागचा-पुढचा विचार न करता मूकबधिर व्यक्तीवर चाकूने हल्ला केला. आरोपी मुलीने कथितरित्या त्या माणसाच्या मानेवर तिच्याजवळ असलेल्या चाकूने वार केले, या हल्ल्यात तो जागीच ठार झाला.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी मंदिर हसौद परिसरातून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. तिच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. आझाद चौक पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 302 (हत्या) आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत