Major Political Shakeup in Gujarat: All Ministers Except CM Submit Resignations
देश

गुजरातच्या राजकारणात मोठी घडामोड, मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे

गुजरात : गुजरातच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्त्वाखालील सध्याच्या मंत्रिमंडळाने अचानक सर्व सदस्यांचे राजीनामे सादर केले. हे राजीनामे केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर घेण्यात आले असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकदरम्यान वरिष्ठ नेत्यांनी मंत्र्यांना हा निर्णय समजावून सांगितला. यानंतर सर्व मंत्र्यांनी आपापले राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे सुपूर्द केले. सुरुवातीला […]

Prayagraj Teen Rapes 5-Year-Old Girl After Watching Porn on mobile
क्राईम देश

१५ वर्षीय मुलाकडून पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार, मोबाईलमध्ये पॉर्न पाहिल्यानंतर घडला धक्कादायक प्रकार

प्रयागराज : दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाने पाच वर्षांच्या शेजारच्या मुलीवर चॉकलेटचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रयागराजमधील गंगापार येथील मऊ आयमा पोलिस स्टेशन परिसरात हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी संध्याकाळी सुमारे ४ वाजता घडली. आरोपी मुलाने पीडित मुलीला आपल्या घरी नेले आणि तिथे तिच्यावर अतिप्रसंग केला. […]

World leaders including Putin, Trump, Netanyahu wish Modi on his birthday
ग्लोबल देश

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुतिन, ट्रम्प, नेतान्याहू यांच्यासह जागतिक नेत्यांकडून शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७५ वर्षांचे झाले. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक जागतिक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावावर भर दिला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आणि मॉस्को-नवी दिल्ली यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी मोदींच्या “प्रचंड वैयक्तिक योगदानाचे” कौतुक केले. क्रेमलिनच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित संदेशात […]

क्राईम देश

माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत वेळ घालवण्यासाठी आईनेच चिमुकलीला संपवले…

हैदराबाद : एका आईनेच आपल्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ४ जून रोजी तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यात घडली. मुलीच्या रात्रीच्या सततच्या रडण्यामुळे तिच्या आईला प्रियकरासोबत वेळ घालवता येत नसल्याने आणि त्यांच्या नात्यात अडथळा येत असल्याने या आईने हा भयानक निर्णय घेतला. आईनेच आपल्या दोन वर्षांच्या मुलीला गळा दाबून ठार […]

Kerala reports new case of brain-eating amoeba; rising deaths from Amoebic Meningoencephalitis
देश

भयावह! केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचा नवीन रुग्ण आढळला, यंदा ६७ रुग्णांची नोंद

केरळ : केरळमध्ये अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (Amoebic Meningoencephalitis) या दुर्मिळ परंतु जीवघेण्या मेंदूच्या संसर्गाचा एक नवीन रुग्ण आढळला आहे. हा आजार प्रामुख्याने Naegleria fowleri नावाच्या सूक्ष्म अमिबामुळे होतो. ह्यालाच मेंदू खाणारा अमिबा (Brain-eating amoeba) म्हणतात. तिरुवनंतपुरममधील १७ वर्षीय मुलाला या आजाराची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करत अक्कुलम टुरिस्ट व्हिलेज येथील स्विमिंग […]

देश

तरुणाने सर्जिकल ब्लेडने कापले स्वतःचे गुप्तांग, धक्कादायक कारण आलं समोर…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने सर्जिकल ब्लेडने आपले गुप्तांग कापले. त्यानंतर घरमालकाच्या लक्षात आल्यानंतर घरमालकाने खोलीत वेदनेने तडफडणाऱ्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्या तरुणाला एसआरएन रुग्णालयात रेफर केले. सध्या एसआरएन रुग्णालयाच्या सर्जिकल […]

Public interest litigation in Supreme Court to cancel India-Pakistan T20 match
देश

१४ सप्टेंबरला होणारा भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

नवी दिल्ली : आशिया कपचा भाग म्हणून दुबईमध्ये १४ सप्टेंबर रोजी होणारा भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली आहे. उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखालील चार कायद्याच्या विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली असून, अधिवक्ता स्नेहा राणी, अभिषेक वर्मा आणि मोहम्मद अनस चौधरी यांच्या माध्यमातून ती सर्वोच्च न्यायालयात सादर […]

National Teacher Awards 2025 – Four Teachers from Maharashtra Honored
देश महाराष्ट्र

महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

नवी दिल्ली : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर केले असून, महाराष्ट्रातील चार शिक्षकांनी आपल्या उत्कृष्ट योगदानामुळे हा प्रतिष्ठित सन्मान प्राप्त केला आहे. शालेय आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील या शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, संशोधन आणि सामाजिक योगदानाद्वारे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली आहे. हा पुरस्कार 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील […]

Rahul Gandhi criticizes Supreme Court's decision on stray dogs
देश

ही क्रूरता! भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भटक्या कुत्र्यांबाबत कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना तात्काळ पकडून त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यास, त्यांना लसीकरण करून कायमस्वरूपी आश्रयस्थानात ठेवण्याचे निर्देश दिले. या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “दिल्ली-एनसीआरमधून सर्व भटक्या कुत्र्यांना […]

2 Indian Soldiers Martyred, 5-6 Injured in Jammu & Kashmir
देश

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद, ५-६ जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये सध्या जोरदार चकमक सुरू आहे. या संघर्षात भारतीय सैन्याचे दोन जवान वीरमरणास पोहोचले आहेत, तर ५ ते ६ जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याचे समोर आले आहे. सध्या सुरक्षा दल दुर्गम जंगलातील परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. यासाठी ड्रोन, […]