Chandrakant Patil
महाराष्ट्र शैक्षणिक

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न, स्वतंत्र कला विद्यापीठासंदर्भात समितीची बैठक

मुंबई : महाराष्ट्रात स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन व्हावे, अशी मागणी कला क्षेत्रातील नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासंदर्भात शासन स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ हटाव कृती समितीने शासनास सादर केलेल्या निवेदनातील तक्रारींच्या अनुषंगाने गठीत […]

नागपूर महाराष्ट्र

नागपुरातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करा, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

मुंबई : नागपूर शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे येत्या १५ दिवसांत दुरुस्त करून ते शासनाकडे हस्तांतरित करावेत, असे सक्त निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री […]

Murder in Pimpri-Chinchwad: Three Arrested for Killing Man Over Money for Alcohol
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : दारूसाठी पैसे लुटण्यासाठी ३३ वर्षीय व्यक्तीची हत्या, तिघांना अटक

चिखली : चिखलीतील पाटील नगरमध्ये झालेल्या भैय्या गमन राठोड (वय 33) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (२ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आला होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने मृतदेह सापडल्यानंतर काही तासांतच आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैय्या गमन राठोड हा मूळचा जळगावचा रहिवासी होता आणि तीन महिन्यांपूर्वी कामासाठी […]

महाराष्ट्र मुंबई शैक्षणिक

बारावी, दहावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षा दि. 11 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च 2025 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध […]

महाराष्ट्र मुंबई

विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा तपासणीसाठी मंत्री, अधिकाऱ्यांनी वसतिगृह, शाळांना अचानक भेटी द्याव्यात

मुंबई : राज्यातील सामाजिक न्याय विभागाची वसतीगृहे, शाळांमधील स्वच्छता, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे भोजन याविषयीची पडताळणी करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी. त्यासाठी विभागात गुणवत्ता नियंत्रण पथक स्थापन करण्यात यावे. विशेष सहाय्याच्या सर्व योजनांचा लाभ शंभर टक्के थेट बॅंक खात्यात (डिबीटीद्वारे)जमा होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

नाशिक महाराष्ट्र

अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्यू पावलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागामधील जवानाच्या वारसांना साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई

मुंबई : अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील जवान तथा वाहन चालक कैलास गेणू कसबे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विशेष बाब म्हणून साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकरणांमध्ये सत्वर मदत होण्याच्या दृष्टीने गृह विभागाच्या धर्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कायमस्वरुपी धोरण तात्काळ करण्याचे […]

महाराष्ट्र मुंबई

सामान्य मुंबईकरांना दिलासा; ग्लोबल मुंबईचा शुभारंभ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई महापालिकेने आज कोणतीही करवाढ, शुल्कवाढ, भुर्दंडवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केल्याने सामान्य मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सकारात्मक, विकासाभिमुख, विद्यार्थ्यांपासून ते चाकरमान्यांपर्यंत आणि गरीब कष्टकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्व वर्गांच्या शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधांचा विचार करणारा हा अर्थसंकल्प आधुनिक मुंबईचा शुभारंभ ठरेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली आहे. मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या […]

Pa. Shivraj Rakshe attacking the referee after his defeat in Maharashtra Kesari 2025 final, causing a major controversy.
अहिल्यानगर महाराष्ट्र

महाराष्ट्र केसरीला गालबोट; पराभवानंतर पै. शिवराज राक्षेला राग अनावर, पंचांना केली मारहाण

महाराष्ट्र केसरी 2025: राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले आहे. अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेचा अंतिम सामना पै. शिवराज राक्षे आणि पै. पृथ्वीराज मोहोळ यांच्यात पार पडला. यावेळी पृथ्वीराज मोहोळने अवघ्या काही सेकंदात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा पराभव केला. या पराभवाने संतापलेल्या शिवराज राक्षेने थेट पंचाची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ […]

क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : ८ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार, आरोपीला पोलिसांकडून अटक

पुणे : एका ४० वर्षीय व्यक्तीला ८ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिस घटनेचा तपास करत आहेत. नागनाथ श्रीहरी कसाळे असे आरोपीचे नाव आहे, तो काळेवाडी फाटा येथील रहिवासी असून बांधकाम कामगार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २८ जानेवारी रोजी सकाळी चिंचवडमधील बिजली नगर येथे घडली. घटनेच्या दिवशी सकाळी […]

महाराष्ट्र मुंबई

दादर रेल्वे स्टेशनमध्ये खळबळ! एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये सापडला मृतदेह

मुंबई : दादर रेल्वे टर्मिनलमध्ये उभ्या असलेल्या रणकपूर एक्स्प्रेसमधील टॉयलेटमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रणकपूर एक्स्प्रेस दादर स्टेशनवर उभी असताना आरपीएफकडून रेल्वेची तपासणी करण्यात आली. यावेळी ही घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, रणकपूर एक्स्प्रेस दादरमध्ये आल्यानंतर आरपीएफकडून रेल्वेची चेकिंग सुरू होती. त्यादरम्यान ही घटना उघडकीस आली. रेल्वेची तपासणी करतेवेळी ट्रेनमध्ये अगदी […]