पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंटेलिजेंस युनिट (एआययू) च्या अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून ६ किलोपेक्षा जास्त हायड्रोपोनिक गांजा, ज्याला हायड्रो वीड असेही म्हणतात, जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारपेठेत जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत अंदाजे ६.१२ कोटी रुपये आहे. ५ ऑगस्ट २०२५ रोजी, एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट IX-२४१ मधून उतरल्यानंतर अतुल सुशील […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
फुलकीडे, बोंड अळी व हुमणी अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना : कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला
राज्यासह नागपूर विभागात समाधानकारक पाऊस झाला व पेरणीही पूर्णपणे झालेली आहे. शेतात पीक डौलाने उभी राहत असून त्यांची वाढ व निकोपतेसाठी शेतकऱ्यांना कसोशीने लक्ष द्यावे लागणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पिकांच्या वाढीबरोबरच कीड व अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या शेतकऱ्यांना नियोजनही करावे लागणार आहे. कापूस पिकावर होणारा फुलकीडे व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव तसेच सोयाबीन, तूर व कापूस […]
बीड शहरातील विविध विकास कामांची पाहणी, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश
बीड : बीड शहरात सुरू असलेली विविध विकास कामे करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार काम करावी. बीडकरांच्या स्मरणात राहील तसेच शहराच्या वैभवात भर घालणारी कामे करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी आज सकाळी बीड शहरातील चंपावती क्रीडा मंडळ, कनकालेश्वर मंदिर, जिल्हा रुग्णालय, येथे सुरू असलेल्या व […]
दारूमुळे मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचीही जनजागृती आवश्यक – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
पुणे, दि. ६ : “दारू पिणे आरोग्यास हानिकारक आहे” असा इशारा मद्याच्या प्रत्येक बाटलीवर छापलेला असतो. मात्र, या इशाऱ्यांचा केंद्रबिंदू मुख्यतः शारीरिक आरोग्यावर असतो. मद्यपानामुळे होणारे मानसिक परिणामही तितकेच गंभीर असून, त्याबाबत जनजागृती करणेही तितकेच आवश्यक आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विल्यम साळवी यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. साळवी यांनी दिलेल्या निवेदनात […]
पुणे : बी. जे. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीचा वसतिगृहात संशयास्पद मृत्यू; आत्महत्येचा प्राथमिक अंदाज
पुणे : राज्य सरकारच्या अधिपत्याखालील बी. जे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्योती कृष्णकुमार मीणा (वय २०), ही विद्यार्थिनी मंगळवारी मध्यरात्री कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहाच्या आवारात मृतावस्थेत आढळून आली. ही दुर्दैवी घटना पुण्यातील आगरकर नगर परिसरातील वसतिगृहात घडली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आत्महत्येचा अंदाज व्यक्त करण्यात आला […]
नवविवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ; काही महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील टाकरखेड वायाळ (ता. देऊळगाव राजा) येथे मंगळवारी (दि. 5 ऑगस्ट) दुपारी एक नवविवाहिता विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. दिपाली वैभव बनसोडे (वय 26) असे या महिलेचे नाव असून, केवळ साडेतीन महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. या प्रकरणाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. मूळची मिसाळवाडी (ता. देऊळगाव […]
६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे, तसेच चित्रपती व्ही.शांताराम व स्व.राज कपूर पुरस्कारांचे वितरण
मुंबई : मराठी चित्रपटांना आणि चित्रकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येणारे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार व पारितोषिकांच्या वितरण सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व मंगळवारी मुंबईतील डोम एसव्हीपी सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी ६० व्या आणि ६१ व्या राज्य मराठी चित्रपटविषयक पारितोषिकांचे, तसेच सन २०२४ करिता चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व विशेष […]
मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे बीज आज वटवृक्ष बनलं आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ व चित्रपती […]
‘उमेद मॉल’ मुळे महिला बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण – मंत्री जयकुमार गोरे
मुंबई : राज्यातील ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना स्थायी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्रे) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून, त्याचा थेट फायदा महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला होईल, असा विश्वास ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल्स उभारण्यात […]
प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्ण व्हायला हवेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते वेळेत पूर्ण व्हायला हवेत. त्यामुळे पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्णत्वास यायला हवेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री वॉररुमधील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस मुख्य […]










