नागपूर : १० वर्षांच्या मुलीवर तिच्या चुलत भावाने बलात्कार केल्याची अतिशय धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. ही घटना ३ मार्च रोजी सकाळी ११च्या सुमारास घडली. ही घटना कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिंगनाबोडी गावात घडली. याप्रकरणातील आरोपी तरुण एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. पीडित मुलगी ही त्याची सख्खी चुलत बहीण असून इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी आहे. […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
मुलुंडमध्ये वडील आणि आजोबांची हत्या करून तरुणाची आत्महत्या
मुंबई : एका तरुणाने स्वतःच्या वडील आणि आजोबांची हत्या करून स्वतः बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. मुलुंड पश्चिम येथील वसंत ऑस्कर बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. शार्दूल मांगले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आज (६ मार्च) सकाळी […]
काळजी घ्या : महाराष्ट्रात कोरोना अनियंत्रित, एका दिवसात 250 टक्क्यांनी वाढले संसर्गाचे प्रमाण
देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची नवीन आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोना पुन्हा अनियंत्रित होत आहे. एकाच दिवसात संसर्गाचे प्रमाण 250% वाढले आहे. शनिवारी राज्यात 10,216 लोक संक्रमित झाले. 5 महिन्यांनंतर ही पहिलीच […]
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ वाढले, मृतदेहाच्या तोंडात पाच रुमाल कोंबलेले आढळले
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराच्या अँटिलीयाच्या बाहेर संशयास्पद स्कॉर्पिओ कार सापडली होती. ती कार मनसुख हिरेन यांची असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. मात्र, आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूने हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. वास्तविक, हिरेन यांच्या मृतदेहाच्या तपासणी दरम्यान त्यांच्या तोंडातून पाच हातरुमाल बाहेर आले आहेत. तसेच त्यांचा मृतदेह नाल्यातून सापडला आहे. […]
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मूळ मालकाचा संशयास्पद मृत्यू
मुंबई : नुकतीच भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. स्फोटकं ठेवण्यात आलेली गाडी ही चोरीची असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. त्यातच आता या कारच्या मूळ मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मनसुख हिरेन असं त्यांचं नाव असून त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन गुरुवारी रात्रीपासून […]
प्राध्यापिकेला पाठवली अश्लील व्हिडीओची लिंक, आरोपी प्राध्यापकाला पाच वर्ष सश्रम कारावास
बीड : एका प्राध्यापकाने सहकारी प्राध्यापिकेला अश्लील व्हिडीओची लिंक पाठवून तिचा विनयभंग केला होता. विशेष आतिरिक्त न्यायालयाने याप्रकरणी आरोपी प्राध्यापकाला पाच वर्ष सश्रम कारावास आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. बीड जिल्ह्यात नोव्हेंबर 2017 मध्ये हा प्रकार घडला होता. शिक्षा सुनावलेला आरोपी गजानन करपे हा बीड शहरातील एका शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून […]
सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरण : NCB कडून 30 हजार पानांचे चार्जशीट दाखल, रियासह 33 आरोपींची नावे
अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्स अँगलचा तपास करणार्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) शुक्रवारी मुंबईतील NDPS न्यायालयात चार्जशीट दाखल केले. हे चार्जशीट 30 हजार पानांचे आहे. आरोपपत्रात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्यासह 33 आरोपींची नावे आहेत. 5 फरार असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचे […]
ब्रेकिंग : प्राप्तिकर विभागाच्या तपासात धक्कादायक खुलासे, फिल्म कंपन्यांनी केली 350 कोटींची कर चोरी
मुंबई : प्राप्तिकर विभाग अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित काही लोक आणि कंपन्यांवर छापे मारून त्यांची चौकशी करत आहे. प्राप्तिकर विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तपासादरम्यान या प्रॉडक्शन हाऊसच्या उत्पन्न आणि शेयरमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत. प्राप्तिकर विभागाने सांगितले कि, आयकर विभागाला 350 कोटी […]
रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठेच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय
अहमदनगर : रेखा जरे यांच्या खुनाला तीन महिने उलटून गेले आहेत. परंतु या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली असून बाळ बोठेच्या अडचणीत वाढ झाली आहे. बाळ बोठेला फरार घोषित करण्याच्या मागणीचा […]
संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला
मुंबई : शिवसेना नेते संजय राठोड यांनी रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. दरम्यान, तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच असल्याची बाब समोर आली आणि प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी करून हा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला देखील आहे. […]










