सिंधुदुर्ग : प्रसिद्ध गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील नानिवडे येथील रहिवासी असलेले नानिवडेकर हे साहित्य क्षेत्रात गझलकार म्हणूनच ओळखले जातात. मधुसूदन नानिवडेकर यांनी वयाच्या १७ व्या वर्षापासून कविता लिहिण्यास सुरुवात केली होती. राज्यभरात त्यांनी गझलांचे अनेक कार्यक्रम केले होते. त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
चित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी व गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. मंत्रालयातील समिती सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येसंदर्भात व […]
शासनाची क्षेत्रीय स्तरावरील महत्त्वाची कार्यकारी पदे तातडीने भरण्याचे अजित पवार यांचे निर्देश
मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांची क्षेत्रीय स्तरावरील महत्त्वाची रिक्त कार्यकारी पदे तातडीने भरण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक रिक्त पदांची माहिती तात्काळ संकलित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. गट ‘अ’, गट ‘ब’ व गट ‘क’ श्रेणीतील कार्यकारी पदे भरतीप्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देणार आहेत. एमपीएससीमार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील वर्ष 2018 पासूनच्या […]
संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना
मुंबई : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मोठ्या उद्योपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्यादृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करावे, ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे, त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून कामगारांची तिथे राहण्याची (फिल्ड […]
डॉक्टरची आरोग्य केंद्रातच आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या कारणामुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ
अहमदनगर : डॉक्टरने आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या करंजी येथे ही घटना घडली. डॉ. गणेश शेळके असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचं नाव असून त्यांनी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे लिहीले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करंजी येथील प्राथमिक […]
बकरी ईद-२०२१ साठी गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : कोरोनामुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे गतवर्षीपासून विविध उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्यात आले आहे. कोरोनाचा धोका अद्यापही कायम असल्यामुळे यंदा 21 जुलै रोजी बकरी ईद ही साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन गृह विभागाने पत्रकाद्वारे केले आहे. सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्यात सर्व […]
लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती
मुंबई : लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. डॉ. माधुरी कानिटकर या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (DCDIS) (Medical) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत. लेफ्टनंट […]
एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक
जळगाव : राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. मंगळवारी ईडीने दिवसभर त्यांची चौकशी केली होती, त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोसरीमध्ये जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीने याप्रकरणी एकनाथ खडसेंची देखील चौकशी केली होती. […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद live, पहा
पत्रकार परिषद – LIVE https://t.co/T6WcG6KFus — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 6, 2021
केंद्र सरकारने महाराष्ट्राला महिन्याला लसीचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, कारण…
मुंबई : केंद्र सरकारने राज्याला दर महिन्याला लसीचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करणारा ठराव आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत मांडला. त्याची कारणे देखील त्यांनी सांगितली. यावेळी कोरोना परिस्थितीची माहिती देतानाच उपनगरीय लोकल ट्रेन सुरू करण्याबाबतही त्यांनी महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले की लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं तर लोकल सुरू […]










