औरंगाबाद : मराठवाडा तसेच विदर्भात १९ व २० फेब्रुवारी रोजी पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामात सुद्धा शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर केरळपासून मराठवाडा ते विदर्भापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ईशान्येकडील वाऱ्यांमुळे वातावरणात बदल झाला आहे. परिणामी, राज्यासह […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गांना दाखवणार हिरवा झेंडा
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्गांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने गुरुवारीच ही माहिती दिली. त्यानुसार पंतप्रधान मोदी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यानंतर त्यांचे भाषणही होणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ठाणे आणि […]
१६ वर्षांच्या मुलाला वन्यप्राण्याने उचलून नेले, चोवीस तासातील अशी दुसरी घटना…
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔषणीक केंद्राच्या समोर असलेल्या दुर्गापूर नेरी येथून अल्पवयीन मुलाला वन्यप्राण्याने उचलून नेले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास १६ वर्षांच्या या मुलाला वन्य प्राण्याने उचलून नेल्याने खळबळ उडाली आहे. हा मुलगा दुर्गापूर वॉर्ड नंबर १ मध्ये आदिवासी आश्रम शाळेच्या मागील परिसरात राहत होता. याच परिसरात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. हा वन्य प्राणी […]
मराठी भूमिपुत्रांच्या हक्कांना आवाज देणारे सहृदयी सुधीर जोशी, मुख्यमंत्र्यांनी केले दुःख व्यक्त
मुंबई : मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांना आवाज देणारा सहृदयी नेता म्हणून सुधीर जोशी यांच्या निधनामुळे गमावला आहे. त्यांच्यासारखे व्रतस्थ आणि निष्ठावान असे उदाहरण आता दुर्मिळ झाले आहे, अशा शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केल्या आहेत. दिवंगत सुधीरभाऊंनी मुंबईचे महापौर आणि महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री म्हणून दिलेले योगदान महाराष्ट्र […]
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सीबीएसईच्या शाळा सुरू कराव्यात – आदित्य ठाकरे
ठाणे : बृहन्मुंबई महानगरपालिकेप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सीबीएसई च्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे केले. डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील 33 किमी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र […]
महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सक्षमीकरण उपक्रम, ‘येथे’ करा अर्ज…
मुंबई : राज्यात महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून या अंतर्गत महाराष्ट्रातील महिला उद्योजकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या 120 महिला उद्योजकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. इच्छुक महिला उद्योजकांनी अर्ज करण्यासाठी www.mahawe.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याची अंतिम […]
ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा; मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव, जाणून घ्या रामसर दर्जा म्हणजे काय?
मुंबई : ठाणे खाडी क्षेत्राला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी राज्याच्या कांदळवन कक्षाने सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली असून हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात येत आहे. रामसर दर्जा मिळाल्यास पक्षी निरीक्षणासाठी देश विदेशातून पर्यटक आकर्षित होतील तसेच पर्यावरण व पर्यटन वाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. यासोबत पाणथळ […]
शेतकरी ते थेट ग्राहक संकल्पनेतून आयोजित ‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सवा’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे सुरु असलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार सुप्रिया सुळे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, कृषी विभागाचे प्रधान […]
राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कर्म शाळा येत्या 1 मार्च पासून होणार सुरू
मुंबई : सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळा व कर्म शाळा कोविड विषयक सर्व नियमांचे पालन करून येत्या 1 मार्च पासून सुरू करण्यात येत आहेत. महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त व जिल्हा स्तरावर जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून शाळा सुरू केल्या जातील. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली […]
16 फेब्रुवारी 2022 : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय
पोहरा येथे शेळी समूह योजना राबविणार – अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या योजनेसाठी 7.81 कोटी इतका निधी देण्यात येईल. पोहरा प्रमाणेच राज्यातील उर्वरित 5 महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी समूह […]










