मुंबई : राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3973 पशूंच्या नुकसान भरपाईची 10.23 कोटी इतकी रक्कम पशूपालकांच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. सिंह म्हणाले, “राज्यामध्ये 8 नोव्हेंबर 2022 अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3428 संसर्ग केंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 216642 बाधित […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
अमेय खोपकर यांची जीभ घसरली, राष्ट्रवादीवाले xxची औलाद, यांना लाजा नाही वाटतं?
ठाणे : मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना जीभ घसरलीय. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना अपशब्द वापरल्याची बातमी समोर आलीय. खोपकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर खालच्या शब्दांत टीका केलीय. “राष्ट्रवादीवाले xxची औलाद आहेत”, अशा अर्वाच्य भाषेत अमेय खोपकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केलीय. माजी खासदार संभाजीराजे यांनी हर हर महादेव चित्रपटावर […]
महाराष्ट्र आणि देश यापलिकडे जाऊन कार्य करणाऱ्या नाट्यसंस्थांसाठी स्पर्धेची दोन स्वतंत्र ऑनलाइन केंद्र होणार
मुंबई : महाराष्ट्राबाहेरील आणि देशाबाहेरील नाट्यसंस्थांना हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी दोन स्वतंत्र ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येतील,अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 59 व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या गोवा येथे रविवारी आयोजित पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ नाट्य कलाकार विजय गोखले, सांस्कृतिक विभागाचे उपसचिव […]
रोजगार मेळाव्यांच्या आयोजनासाठी आता भरीव आर्थिक तरतूद- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई : राज्यातील उद्योग, कारखाने, खाजगी आस्थापना, कॉर्पोरेट संस्था यामधील रोजगार भरतीसाठी कौशल्य विकास विभागामार्फत वेळोवेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. या मेळाव्यांच्या आयोजनासाठी आता भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून विभागीय तसेच जिल्हास्तरावरील प्रत्येक मेळाव्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा […]
अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करचुकवेगिरी रोखावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : देशात जीएसटी संकलनात राज्याचा सर्वात मोठा वाटा आहे. वस्तू व सेवा कर विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यापुढेही करचुकवेगिरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू व सेवा कर विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य मनोज […]
शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल घोषित
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 रोजी सायं. […]
हर हर महादेव शो बंद पाडला, प्रेक्षकाला मारहाण, आव्हाडांच्या १०० समर्थकांवर गुन्हे दाखल
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेवचा शो बंद पाडला होता आणि एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. या प्रकरणी आता 100 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहे. हरहर महादेव सिनेमामावरून राष्ट्रवादीचे आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले. त्यांनी प्रेक्षकांना […]
भीषण अपघात; वाळूने भरलेला डंपर रिक्षावर उलटला, ३ विद्यार्थिनींसह चालक जागीच ठार
माणगाव : मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर नजीक कशेडी घाट रस्त्यावर चोळई गाव हद्दीत भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालकासह 3 विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला आहे. परिक्षा देऊन या तिन्ही विद्यार्थिनी घरी चाललेल्या होत्या. या अपघातामुळे गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कशेडी घाट मार्गावर चोळई गावच्या वळणावर हा अपघात घडला. वाळूने भरलेला डंपर अचानक […]
धक्कादायक! शेतकरी जिवाच्या आकांताने ओरडला, शेजारचे धावत गेले, जे दृश्य दिसलं ते पाहून शेतकरी हादरले…
चंद्रपूर : पिकांची देखरेख ठेवण्यासाठी मचाणीवर चढलेल्या भीमा घोगलोत नावाच्या शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. बिबट्याने थेट मचाण गाठली. शेतकऱ्यावर हल्ला केला. त्याला लांब फरफटत नेले. ओरडण्याचा आवाजाने इतर शेतकऱ्यांनी धाव घेतली. या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील या घटनेने शेतकरी हादरले आहेत. प्राप्त माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील थोमापूर येथील भीमा घोगलोत नेहमीप्रमाणे शेतात पीक संरक्षणासाठी […]
कौतुकास्पद उपक्रम! अनाथ आश्रमातील मुलांना दीपावली फराळ व कपडे वाटप
पुणे : पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील चिंतामणी गार्डन गृहरचना संस्थेच्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. वर्षीही हि परंपरा कायम राखत जनसेवा फाउंडेशन भिलारेवाडी येथील अनाथ आश्रमातील मुलांना दीपावली फराळ व कपडे वाटप करण्यात आले. चिंतामणी गार्डन सोसायटीचे अध्यक्ष सुनील पाबळे यांनी सर्व १४९ फ्लॅटधारकांना स्वेच्छेने मदत निधी देण्याचे आवाहन केले होते. […]










