मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात पाच हजार इलेक्ट्रिक गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासह दोन हजार डिझेल गाड्या खरेदी करण्यात येतील. तसेच डिझेलवरील पाच हजार गाड्यांचे टप्प्याटप्प्याने ‘एलएनजी’मध्ये रुपांतर करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक असून स्वच्छता-टापटीपपणा ठेवून गाड्यांची […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
औरंगाबादमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, भीषण अपघातात चौघांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी
औरंगाबाद : औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील कायगावजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. कायगाव येथे स्विफ्ट आणि वॅगन आर कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कायगाव येथे स्विफ्ट आणि वॅगन आरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. […]
कोकणातील सर्व रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिले’हे’ निर्देश
मुंबई : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या सर्व प्रमुख स्थानकांच्या सुशोभीकरणाची प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दिले. कोकण रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण, नूतनीकरण, स्थानकांचे सुशोभीकरण आदी विविध विषयासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी […]
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल
ठाणे : भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना नेत्या वंदना डोंगरे यांनी तक्रार दाखल केली आहे. गांधी यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी दाखल करण्यात आली. आयपीसी कलम 500, 501 अंतर्गत नॉन-कॉग्निझेबल (एनसीआर) […]
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू तर चार जण जखमी
मुंबई : रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर शुक्रवारी कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. कारने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला, या अपघातात पाच जण ठार तर चार जण जखमी झाले. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ढेकू गावाजवळ हा अपघात झाला. सर्व मृत पुरुष असून चार जखमींपैकी एक महिला असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून […]
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडू शकते, संजय राऊतांच मोठं वक्तव्य
मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं असतानाच या मुद्द्यामुळे महाविकास आघाडीत फूटही पडू शकते, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. या वक्तव्यावरून भाजप आणि मनसेकडून राहुल गांधींवर टीका केली जात आहे, त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय […]
मुंबईतील गोवर आजार नियंत्रणाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : मुंबई महानगरातील गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देऊन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील गोवर साथ नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेतली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आरोग्यमंत्री डॉ. […]
सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रोत्साहन देणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : गोंदिया जिल्ह्याचे वैभव आणि निसर्ग सौंदर्याचे प्रतिक असलेल्या सारस पक्षाच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्यासाठी घरटे बांधणाऱ्या “सारस मित्रांना” प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या वन विभागाने पुढाकार घेतला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात बैठक घेवून पक्षाचे संवर्धन करणाऱ्या शेतमालाच्या प्रोत्साहनात्मक बक्षिसाकरिता तरतूद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय व्याघ्र प्रकल्पाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील व्याघ्र […]
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात 6677 पशुपालकांच्या खात्यांवर 17.16 कोटी रुपये जमा
मुंबई : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा ६ हजार ६७७ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. १७.१६ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. १७ नोव्हेंबर, २०२२ अखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3 हजार 608 संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला […]
अतिवृष्टीमुळे बाधित औरंगाबाद, पुणे विभागातील शेतकऱ्यांना 1286 कोटींचा निधी मंजूर, राज्य शासनाचा निर्णय
मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना प्रचलित दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत दुपट्टीने मदत देण्याचा राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला होता, त्यानुसार औरंगाबाद आणि पुणे विभागासाठी १२८६ कोटी ७४ लाख ६६ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे लाखो बाधित […]










