वाशिम : जन्मदात्या पित्याने जमिनीच्या वादातून पोटच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात आरोपीची पत्नी व १० वर्षाचा दुसरा मुलगा देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाशिम मध्ये खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना ७ तारखेला मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील इचुरी गावात घडली आहे. मिळालेल्या […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
पुढील 2 ते 3 तासात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, ‘या’ ४ जिल्ह्यांना अलर्ट जारी
मुंबई : हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात ४ जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 2 ते 3 तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात ३० ते ४० किमी प्रतितास या वेगाने वादळी वारे वाहतील, अशी शक्यता वर्तवण्यात […]
Maharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या…
SSC Result 2023: बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आता आपल्या निकालाची प्रतीक्षा आहे. २ जून रोजी हा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान हा निकाल लागल्यानंतर कुठे आणि कसा पाहायचा? याचा सविस्तर तपशील जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ […]
प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर
SSC Result 2023 Date & Time : बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आता आपल्या निकालाची प्रतीक्षा आहे. दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार? याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, हा निकाल २ जून रोजी जाहीर होणार आहे. निकाल लागल्यानंतर कुठे आणि कसा पाहायचा? याचा सविस्तर तपशील जाणून घेऊया. राज्यातून एकूण १५,७७ लाख […]
आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे तसेच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्य आपत्ती […]
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावाची अनेक कामे प्रलंबित, निवडणुका त्वरीत होण्याची गरज – खासदार सुप्रिया सुळे
पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नऱ्हे गावातील पारी टॉवर्स सोसायटीला भेट दिली. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीच्या शेजारी असलेल्या गावांचा मनपात समावेश करण्यात आला. याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, हे प्रश्न सुटायला हवेत. एकूणच या गावातील राहणीमानाचा दर्जा आता उंचवायला हवा, शहरीकरणाचा वेग वाढायला हवा, परंतु अनेक वर्ष होऊनही पुणे […]
कुशल, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर नक्कीच मोलाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर मार्गदर्शन शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
कोल्हापूरहून पंढरपूरला निघालेले, सांगलीत विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची बोलेराला धडक, ७ जण ठार
सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी येथे भीषण अपघातात ७ जण जागीच ठार झाले आहेत.रत्नागिरी – नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची समोरा-समोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला आहे.मृतांमध्ये ३ महिला,३ पुरुष आणि १२ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.बोलेरो गाडीतील मृत हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे,हे सर्व जण एकाच गाडीतून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी […]
आमदार अपात्रतेच्या निर्णयासाठी कोणते निकष लावणार? राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली प्रक्रिया
मुबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालानंतर सगळ्यांचं लक्ष राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे लागलं आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अंतिम निकाल विधानसभा अध्यक्ष घेतील, असं न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर त्यावरून मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. खुद्द राहुल नार्वेकर निकाल आला तेव्हा लंडनमध्ये होते. आता ते परत आल्यानंतर नेमकी ही निर्णय प्रक्रिया कशी आणि […]
मोठी बातमी,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. जयंत पाटील यांना उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होता. ईडीकडून या प्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी […]










