मुंबई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राज्याची महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांचा समावेश होता. आता यात नव्याने 5 जिल्ह्यांचा समावेश करून 21 जिल्ह्यांत ही योजना व्यापक स्वरूपात राबविणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत सांगितले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत झालेल्या गैरव्यवहाराचा प्रश्न विधानसभा सदस्य माधवराव […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्यस्तरावर डॅशबोर्ड विकसित करणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : बोगस खते विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर विभागामार्फत कारवाई सुरू आहे. खतांच्या लिंकिंग करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना विभागामार्फत नोटीस पाठवलेल्या आहेत. राज्यात कुठेही खतांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी राज्यस्तरावर डॅशबोर्ड विकसित करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात व विशेषतः नागपूर जिल्ह्यात बोगस खतांच्या तपासणीचे काम […]
अमरावतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सौंदर्यीकरणासंदर्भात लवकरच निर्णय घेणार
मुंबई : अमरावती शहरातील इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगतची जमीन पुतळा परिसर सौंदर्यीकरणासाठी संपादित करण्याची प्रक्रिया लवकरच करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी विधानसभेत सांगितले. याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य बळवंत वानखडे, सुलभा खोडके यांनी मांडली होती. मंत्री विखे -पाटील म्हणाले की, अमरावती महानगरपालिका हद्दीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सौंदर्यीकरणाच्या […]
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र लाभार्थींच्या फेरनोंदीबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा
मुंबई : सर्वसामान्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत प्रपत्र ‘ड’ मध्ये तांत्रिक कारणामुळे अपात्र ठरलेल्या लाभार्थींपैकी पात्र असलेल्या लाभार्थींच्या नोंदी पुन्हा करण्याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे, असे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितले. ‘राज्यातील घरकुल योजनेतील अडचणी’ यासंदर्भात विधानसभा सदस्य समीर कुणावर यांनी […]
खंडकरी शेतकरी वाटप जमिनीचा भोगवटा वर्ग १ करण्याच्या प्रस्तावावर लवकरच धोरणात्मक निर्णय
मुंबई : खंडकरी शेतकरी यांना वाटप करण्यात आलेल्या क्षेत्राचा दर्जा भोगवटा वर्ग २ असा निश्चित करण्यात आला आहे. अशा जमिनींचा भोगवटा वर्ग – २ वरून भोगवटा वर्ग – १ करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले. राज्यातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद […]
नाशिक शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर पोलिस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईणकर यांची सहपोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. सरकारी कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याप्रकरणी असलेल्या कलम ३५३ (अ) तरतुदीचा दुरुपयोग होत असल्यास पुढील […]
रिंगरोड प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया अन्यायकारक, शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
पुणे : रिंगरोड प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया अन्यायकारक असल्याचे म्हणत अपुरा मोबदला दिला जात असल्याच्या विरोधात शेतकरी आवाज उठवत आहेत. आपल्या जमिनीला बाजारभावापेक्षा पाचपट अधिक भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी हक्क समिती या शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांचा विकासाला पाठिंबा आहे, मात्र भूसंपादन प्रक्रियेतील विसंगती ते अधोरेखित करत आहेत. प्राथमिक […]
पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीतील पाण्याचा विसर्ग बंद
पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग आज दुपारी 1 वाजता अधिकाऱ्यांनी बंद केला आहे. गेल्या काही तासांत पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे पाटबंधारे […]
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट ११ गावांतील मलवाहिन्या कामांच्या निविदांचे थर्ड पार्टी ऑडिट – मंत्री उदय सामंत
पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट ११ गावांमधील मलवाहिन्या विकसित करण्याच्या कामांच्या निविदांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ( सीओईपी) तज्ज्ञांमार्फत त्रयस्थ पद्धतीने लेखापरीक्षण केले जाईल, अशी माहिती, मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भीमराव तापकीर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री सामंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, पुणे मनपाच्या ११ समाविष्ट गावांमधील विविध […]
समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी सुविधांची संख्या वाढविणार – दादाजी भुसे
मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय येणाऱ्या काळात महामार्गावरील सुविधांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य सुनील केदार यांनी, या महामार्गावर झालेल्या अपघातासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री भुसे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले […]









