मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याप्रकरणी कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकरणांची माहिती लपवून ठेवल्याचा आरोप होता ती खासगी होती आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम झाला असता असे वाटत नाही, हे स्पष्ट करत न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त केलं. […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
पुणे : निगडीतील एका विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह
पुणे : निगडीतील साईनाथ नगर परिसरात एका विहिरीतून एका महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी हा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देऊन पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या अग्निशमन दलाला सकाळी 6:11 वाजता एक महिला विहिरीत आढळल्याचा फोन आला. […]
जिल्ह्यात विविध सार्वजनिक उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था चोखपणे ठेवावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर : जिल्ह्यात विविध सार्वजनिक उत्सवाच्या अनुषंगाने कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत पोलीस विभागाने त्यांच्या स्तरावरून योग्य ती खबरदारी घेऊन सुरक्षा व्यवस्था चोखपणे ठेवावी, असे आवाहन महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठकीत पालकमंत्री विखे पाटील मार्गदर्शन करत होते. […]
रामोशी, बेरड समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील रामोशी व बेरड समाजाचे योगदान लक्षात घेऊन या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. सामाजिक समतेला आर्थिक समतेशिवाय अर्थ नाही, हे लक्षात घेऊन शासनाने राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले. पुरंदर तालुक्यात भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती […]
मुंबईत जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सव – पर्यटन मंत्री गिरीष महाजन
मुंबई : मुंबईत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई फेस्टिव्हल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे या फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. मंत्री महाजन यांनी आज दुपारी उद्योगपती महिंद्रा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी […]
चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वैमानिक बनण्याची संधी – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : चंद्रपूर येथे होणाऱ्या फ्लाइंग क्लबमुळे या जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती – जमाती, इतर मागास वर्ग आणि आदिवासी घटकातील विद्यार्थ्यांना वैमानिक होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येथील फ्लाइंग क्लब तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. मंत्रालयात मंत्री मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे फ्लाईंग […]
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : ओबीसी बांधवांवर अन्याय न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. वर्षा शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पण काही मंडळी दिशाभूल करताहेत. मराठा समाज आणि […]
कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जारंगे – पाटील यांनी ‘निजामकालीन महसुली रेकॉर्ड तपासून याठिकाणी पूर्वी जे कुणबी म्हणून नोंदणीकृत होते त्यांना मान्यता’ देण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने ही समिती स्थापन करण्यात […]
मराठी भाषा विद्यापीठाच्या उभारणीला वेग देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मराठी भाषा विद्यापीठाच्या उभारणीला वेग देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त वडाळा येथील महानुभाव श्री कृष्ण ज्ञान मंदिर येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेतले व पूजाही केली. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, कविश्वर कुलभूषण आचार्यप्रवर श्रीविजयराज बाबा शास्त्री, राणीबाईजी शास्त्री, राहुलदादाजी महानुभाव, धर्मकुमार प्रसाद महानुभाव तसेच […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंडिता मालिनीताई राजूरकर यांना श्रद्धांजली
मुंबई : शास्त्रीय संगीतातील एक दैवी सूर निमाला आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाल्हेर घराण्यातील ज्येष्ठ गायिका मालिनीताई राजूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘आपल्या स्वरांनी ग्वाल्हेर घराण्यातील गायन वैशिष्ट्ये जग आणि देशभरात पोहचवणाऱ्या मालिनीताईंची आगळी ओळख होती. त्यांच्या निधनामुळे शास्त्रीय संगीतातील एक दैवी सूर निमाला आहे. ज्येष्ठ गायिका पंडिता मालिनीताई राजूरकर यांना […]










