मुंबई : शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गास मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या 205 किलोमीटरच्या द्रुतगती मार्गास 14 हजार 886 कोटी रुपये खर्च येईल. या मार्गाचे काम बीओटी तत्वावर करण्यात येईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर 2008च्या पथकर धोरणानुसार वाहनांवर पथकर लावण्यात येईल. या मार्गासाठी 2हजार 633 […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र, दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयास मंजुरी
मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी वरिष्ठस्थर न्यायालय स्थापन करून पदे मंजूर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयानुसार 19 नियमित व 6 बाह्य यंत्रणेद्वारे पदे भरण्यात येतील. याशिवाय दिवाणी न्यायालयासाठी देखील 21 नियित व 4 बाह्य यंत्रणेद्वारे पदे भरण्यात येतील.
धान उत्पादकांना दिलासा! प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
मुंबई : पणन हंगाम 2023-24 करिता धानाच्या भरडाईसाठी भात गिरणीधारकांना केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या भरडाई दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून प्रती क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर मंजूर करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे पणन हंगाम 2023-24 मध्ये खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईकरिता केंद्र शासनाकडून दहा आणि राज्य शासनाकडून चाळीस रुपये […]
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०२४ जाहीर, ‘ही’ आहेत धोरणाची उद्दिष्टे
मुंबई : राज्याच्या सांस्कृतिक धोरण-२०२४ ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० चे पुनर्विलोकन करण्यासाठी २०२२ मध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचे कार्याध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे होते, या समितीने तसेच विविध उपसमित्यांनी तयार केलेले धोरण आज मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात […]
बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना, शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी
मुंबई : जिल्हा तसेच प्रादेशिक परिविक्षा व अनुरक्षण संघटनेमार्फत चालवली जाणारी निरिक्षण गृहे व बालगृहातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना व शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याची शिफारस चटोपाध्याय आयोगाने केली होती. या निर्णयानुसार थकबाकी […]
लोहगाव विमानतळाचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे नामकरण
मुंबई : लोहगाव विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयानुसार नामकरणाची शिफारस केंद्र शासनास पाठवण्यात येईल. लोहगाव विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव देण्याची विनंती वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली होती.
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाच्या मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणास मान्यता
मुंबई : राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याने संबधित शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, अशी माहिती, मदत, पूनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. […]
बाल लैंगिक अत्याचार विरोधी रॅलीचे आयोजन, विद्यार्थी, पालक, मुख्यध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी
पुणे : सध्या बालशोषणाच्या घटनांची मालिका वारंवार सुरु आहे. ज्यात जवळचे नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींकडूनच बालकांच्या लैंगिक शोषणाच्या घटना सद्यःस्थितीत घडत असताना दिसून येत आहे. या बाबत पालकांनी जागरुक राहून ‘गुड टच-बँड ट्च’ विषयी समुपदेशनासह सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर झी लर्न प्रस्तुत, किडझी प्री स्कुलच्या कस्पटे वस्ती, पिंपळे गुरव, चौधरी पार्क या शाखेकडून […]
नाशिक : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, पालकांनी केला गंभीर आरोप
नाशिक : के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात अस्मिता संदीप रौदळ-पाटील (वय १८) या विद्यार्थिनीने मुलींच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अस्मिता अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. मृत मुलीच्या पालक व नातेवाईकांनी वसतिगृहाबाहेर थांबून यासंबंधी जाब विचारला. त्यानंतर […]
राज्यात पुढील आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता
पुणे : अंदमान बेटाच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. परिणामी राज्यात २३ ते २८ सप्टेबर या काळात दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंदमान बेटाच्या उत्तर भागात आज हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी […]





