मुंबई : नाशिक- नांदूरनाका येथे झालेल्या खासगी बसच्या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करून या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघाताच्या कारणांचा सर्वंकष चौकशीतून […]
नाशिक
मोठी दुर्घटना! नाशिकमध्ये खासगी बसला भीषण आग; दहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू
नाशिकः नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. मिरची चौकात पहाटेच्या सुमारास खासगी बसला अचानक आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी केली आहे. ही बस यवतमाळहून […]
कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणार – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक : नाशिक हा शेतीप्रधान जिल्हा असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने शेती व्यवसाय विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. येणाऱ्या काळात कृषी उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला निश्चित चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील उद्योजकांच्या संस्थांचे पदाधिकारी व संबंधित प्रमुख अधिकारी यांची संयुक्त […]
नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणांनी कायमस्वरुपी व्यवस्थापन करावे, केंद्रीय योजनांची जनजागृती करावी
नाशिक : नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणांनी कायमस्वरुपी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तसेच केंद्रीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दिशा समितीच्या बैठकीत केंद्रीय योजनांचा आढावा घेताना केंद्रीय त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी […]
नाशिक येथील मुलींच्या वसतिगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा
मुंबई : नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा देण्यासंदर्भात करार करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नाशिक येथे मुलींचे शासकीय वसतीगृह ज्या जागेत आहे त्या जागेतील २४८५ चौरस मिटर क्षेत्र वसतीगृहाच्या म्हणजेच शासनाच्या ताब्यात आहे. या ठिकाणी वसतीगृहाचे जेवढे क्षेत्रफळ आहे तेवढे म्हणजेच […]
जामशेत व ओतूर धरणाचे परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करावे, डॉ. भारती पवार यांच्या सूचना
नाशिक : जामशेत व ओतूर धरणांचे प्रस्ताव शासनास सादर करताना ते परिपूर्ण असावेत, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत. शासकीय विश्रामगृह येथे जलसंपदा व जलसंधारण विभागाच्या ओतूर व जामशेत या धरणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी डॉ. पवार बोलत होत्या. या बैठकीस जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजय […]
कातकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविणार
नाशिक : आदिम आदिवासी कातकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविणार असून सर्व संबंधित यंत्रणांनी त्याबातचा ठोस कृती आराखडा तयार करून सहा महिन्यात त्याची १०० टक्के अंमबजावणी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्याचे निर्देश आज आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. इगतपुरी तालुक्यातील आदिम आदिवासी कातकारी समुदायाच्या बालकांकडून अहमदनगर जिल्ह्यात वेठबिगारी केली जात असल्याच्या […]
पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह अन्य प्रकल्पांना गती द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘महारेल’ला निर्देश
मुंबई : पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पासह ‘महारेल’ च्या वतीने सुरु असलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, पुणे- नाशिक अतिजलद रेल्वे मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट […]
उर्ध्व गोदावरी प्रकल्पास प्रशासकीय मान्यता, देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन पाळल्यामुळे छगन भुजबळ यांनी मानले आभार
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या १ हजार ४९८ कोटी ६१ लाख रुपये खर्चास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हा प्रकल्प आदिवासी क्षेत्रात असून गोदावरील नदीच्या उपनद्यांवर आहे. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यातील ७४ हजार २१० हेक्टर सिंचन क्षेत्रास याचा लाभ होईल. […]
सिन्नर येथे दिवाणी न्यायालय स्थापन करणार
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्याचा मान्यता निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी १६ नियमित व ४ पदे बाह्य यंत्रणेद्धारे अशा २० पदांना देखील मान्यता देण्यात आली. यासाठी एकूण ९७ लाख ८६ हजार खर्च येणार आहे. बहुसंख्य पक्षकारांना ५ लाखांवरील दिवाणी […]









