मुंबई : दहशतवादी कृत्ये हे वाईटच आहेत. दहशतवादाशी लढा देणे ही संयुक्त राष्ट्र संघाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एच. ई. अँटोनियो गुटेरेस यांनी केले. त्यांनी आज हॉटेल ताज येथे भेट देऊन 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. या निमित्ताने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला त्यांनी भेट दिल्यानंतर उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत […]
मुंबई
ग्रामीण उद्योजकांच्या वस्तूंची विक्री मंत्रालयाच्या प्रांगणात
मुंबई : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून खादी व ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीचे आयोजन त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील दालनांना उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी भेट दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्यावतीने 18 ऑक्टोबर ते 21 […]
दीड महिन्यात 1 कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा मोफत एसटी प्रवास
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाच्या निर्णयामुळे अवघ्या ५२ दिवसांमध्ये १ कोटी ४ लाख ८६ हजार ज्येष्ठांनी याचा लाभ घेतला आहे. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने १ कोटी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद राज्य शासनाला मिळाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी […]
साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे, मुख्यमंत्र्यांची पत्राद्धारे पंतप्रधानांना विनंती
मुंबई : साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे. कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून यामुळे कारखान्यांना मर्यादा येतील, यासंदर्भात आपण हस्तक्षेप करून वाणिज्य तसेच ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांना केली आहे. आपल्या पत्रात […]
‘ते संबंध सहमतीने’, बलात्काराच्या आरोपीला पीडितेशी लग्न करण्याच्या अटीवर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बलात्काराच्या खटल्यातील एका आरोपीला या अटीवर जामीन मंजूर केला की पीडित महिला जर एक वर्षाच्या आत सापडली तर त्याने तिच्याशी लग्न करावे. सध्या ही पीडित महिला बेपत्ता आहे. आरोपीने या वर्षाच्या सुरुवातीला दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला आश्वासन दिले की तो पीडितेशी विवाह करण्यास आणि मुलाचे पितृत्व स्वीकारण्यास तयार आहे. दरम्यान, […]
संजय राऊत यांना आजही दिलासा नाहीच, पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना आजही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत सध्या तुरुंगात आहेत. पत्राचाळ प्रकरण नेमकं काय? पत्राचाळ प्रकरणात बिल्डरने १०३४ कोटींची फसवणूक केल्याची तक्रार दाखल होती. २००८ मध्ये पत्राचा […]
अंधेरी (पू) पोटनिवडणुकीसाठी 7 अर्ज; 14 पैकी 7 उमेदवारांची उमेदवारी मागे
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार दुपारी ३ वाजेपर्यंत सदर १४ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आता ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या मतदान […]
हायड्रोजन ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी महाप्रित आणि स्टेनबीस यांच्यात सामंजस्य करार
मुंबई : महाराष्ट्रात इंडो – जर्मन हायड्रोजन ऊर्जा उद्योग आणि तंत्रज्ञान विकास साधण्यासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) कंपनीद्वारे स्टेनबीस सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर इंडिया (2E नॉलेज व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे एक युनिट) यांच्यात हैदराबाद येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी, महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन […]
वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांचा वाहन परवाना निलंबित करावा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाची कार्यवाही केली जाते. मात्र ज्या वाहनचालकांवर पाच ते सहा वेळा दंडाची कारवाई झाली आहे त्यांचा वाहन परवाना काही दिवस, महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाई करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले. द्रुतगती महामार्गावर वेगाने मार्गिका बदलणाऱ्या (लेन जंप) वाहनचालकांवर कारवाईसाठी पथक नेमावे. या पथकाच्या माध्यमातून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर नजर […]
अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषित करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट संबंधित विभागांनी तातडीने दूर करावेत, असे निर्देश देतानाच राज्यात 23 ठिकाणी आधुनिक वाहन चाचणी केंद्र तसेच वाहन परवान्यासाठी स्वयंचलित वाहन चलन चाचणी पथ स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आपल्या हद्दीतील ब्लॅक स्पॉट दूर करण्यासाठी […]










