student committed suicide
क्राईम महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक घटना! शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून १३ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, चिठ्ठी लिहून शिक्षिकेवर गंभीर आरोप

कल्याण: कल्याण पूर्वेतील आयडियल शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासातून उघड झाली आहे. विघ्नेश प्रमोदकुमार पात्रो असे या मुलाचे नाव असून तो आयडियल या शाळेत इयत्ता आठवीत शिकत होता. मृत्यूपर्वी त्याने लिहलेल्या चिठ्ठीत शाळेच्या […]

A body was found in the toilet of Nandigram Express
क्राईम महाराष्ट्र मुंबई

नंदीग्राम एक्सप्रेसच्या शौचालयामध्ये सापडला मृतदेह, काही दिवसांपूर्वी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

मुंबई : नेहमीच गर्दीने गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना घडली. नंदिग्राम एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक मृतदेह सापडल्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. नंदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात 50 वर्षांचा व्यक्ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला असून पोलिसांनी याप्रकरणी मृत्यूची नोंद केली आहे. रेल्वे पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आला. मृत व्यक्तीने ट्रेनच्या शौचालयात आत्महत्या का […]

The person who sent the obscene audio tape was finally arrested
क्राईम महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक! महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणाऱ्या विकृताला अखेर अटक, 25 महिलांना त्रास देत असल्याचे निष्पन्न

मुंबई: मुंबईतील 25 महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणाऱ्या विकृताला अटक करण्यात आली आहे. निर्मल नगर पोलीस ठाण्याने ही कारवाई केली असून आयटी अॅक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अजीज मोहम्मद निसार खान (36) असे अटक आरोपीचे नाव असून तो वांद्रे येथील बेहरापाडा परिसरात पराठाचे दुकान चालवतो. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती […]

Education Eligibility Test
महाराष्ट्र मुंबई

आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदतवाढ

आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 1 डिसेंबर 2018 अन्वये ही विशेष भरती मोहीम राबविण्यात आली होती. यातील नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकाना ही मुदत देण्यात येत आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून पुढील काळात त्यांना सेवाविषयक […]

Infrastructural facilities in small towns will speed up
देश महाराष्ट्र मुंबई

लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार; कर्ज उभारण्यास मान्यता

मुंबई – लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग देण्यासाठी कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड मार्फत खुल्या बाजारातून कर्ज घेऊन हा निधी उभारण्यात येईल. महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अशा या योजनेतून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना स्व […]

Approval of the policy of providing flats to the project affected
देश महाराष्ट्र मुंबई

दिलासादायक! प्रकल्पबाधितांना सदनिका उपलब्ध करण्याच्या धोरणास मान्यता

मुंबई : प्रकल्पबाधितांना सदनिका उपलब्ध करून देण्याच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रकल्पग्रस्तांच्या सदनिकांच्या निर्मितीमध्ये वाढ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या धोरणानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि एमएमआरडीए यांनी पुढील 15 वर्षात पुरेशा प्रमाणात प्रकल्पग्रस्त सदनिका निर्माण होण्यासाठी सविस्तर कृती आराखडा तयार करावयाचा आहे. […]

Har Ghar Tricolor
देश महाराष्ट्र मुंबई

९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान; अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ९ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येईल. यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग नोडल विभाग राहणार असून ग्रामविकास विभाग हा ग्रामीण […]

Cabinet decision
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मंत्रिमंडळ निर्णय – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता, अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार, प्रकल्पबाधितांना सदनिका उपलब्ध करण्याच्या धोरणास मान्यता

महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता; पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 87 हजार 342 कोटी 86 लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार […]

To increase the amount received under Pradhan Mantri Awas Yojana
देश महाराष्ट्र मुंबई

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करावी, महाराष्ट्र शासनाच्या मोदी आवास योजनेसाठी राज्याकडे पुरेसा निधीही नाही, हि योजना केंद्र सरकारने आपल्या ताब्यात घ्यावी – खासदार सुप्रिया सुळे

दिल्ली : बांधकाम क्षेत्रातील वाढत्या महागाईमुळे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दिली जाणारी रक्कम अपुरी पडत असून त्यात वाढ करावी. याबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या मोदी आवास योजनेसाठी राज्याकडे पुरेसा निधीही नाही. परिणामी अनेक पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नसल्याने ही संपूर्ण योजना केंद्र सरकारने आपल्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया […]

Prevention of online sexual exploitation of children is everyone's responsibility - Women and Child Development Minister Aditi Tatkare
महाराष्ट्र मुंबई

ऑनलाईन माध्यमातून होणारे बालकांचे लैंगिक शोषण रोखणे सर्वांची जबाबदारी

मुंबई : लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना इंटरनेटमुळे जगभरातल्या ज्ञानाची कवाडे खुली झाली आहेत. परंतु लहान मुलांविरोधातील गुन्हेगारीही वाढली आहे. त्यातूनच ऑनलाईन माध्यमातून होणारे मुलांचे लैंगिक शोषण रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड […]