मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण झाला आहे. जोशींच्या या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं असं जाहीर आव्हानचं त्यांनी दिलं […]
मुंबई
भैय्याजी जोशींच्या ‘मुंबईत मराठी नाही, गुजरातीही चालेल’ वक्तव्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून संतप्त प्रतिक्रिया, जोशी यांचे स्पष्टीकरण…
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईच्या विविध भाषिक संस्कृतीसंबंधी एक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये संताप व्यक्त करण्यात आले आहे. मुंबईमध्ये मराठी भाषेची महत्त्वपूर्ण ओळख आहे, आणि या विधानामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. भैय्या जोशी यांनी मुंबईतील भाषिक विविधता आणि […]
अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला, पोस्टमुळे चर्चांना उधाण
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले आहे. यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा होणार आहे, असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यांनी एक […]
शासनाकडून मराठी नाटक, मराठी चित्रपट, कला आणि लोककला तसेच लोकसंस्कृतीला प्रोत्साहन
मुंबई : आपले सरकार इथल्या मातीला नमन करणारे आहे. मराठी नाटक, मराठी सिनेमा, कला आणि लोककला तसेच लोकसंस्कृतीला प्रोत्साहन देणारे आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचलनालय यांच्यातर्फे मराठी भाषा गौरव दिना निमित्त माटुंगा येथे ‘अमृतातेही पैजा जिंके’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मराठी […]
अलिबागच्या समुद्रात मच्छिमार बोटीला भीषण आग, सर्व खलाशी सुखरूप असल्याची माहिती
मुंबई : आज सकाळी मुंबईजवळील अलिबागच्या समुद्रात मच्छिमार बोटीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बोटीमध्ये १८-२० खलाशी असल्याची माहिती मिळाली असून, सर्व खलाशी सुखरूप आहेत. सकाळी १० वाजेच्या सुमारास बोटीने पेट घेतला आणि त्यानंतर आग पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, ही मच्छिमार बोट साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची आहे. आगीमध्ये बोटीच्या वरील […]
मावळ तालुक्यातील विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश, सुरक्षिततेसाठी लोणावळा व कार्ल्यात पर्यटक पोलिस ठाणे स्थापन करणार
मुंबई : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रुग्णालयांची कामे गतीने पूर्ण करावी. मौजे जांभूळ येथील क्रीडा संकूल सर्व सुविधायुक्त, मावळ तालुक्याचा गौरव वाढवणारे असावे, देहू नगरपंचायतीसह, खडकाळे, वराळे, डोणे आढळे, डोंगरगाव कुसगाव, पाटण, कार्ला व परिसरातील पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण कराव्यात. मौजे कार्ला येथे फनिक्युलर रोपवे उभारण्यासह श्रीएकवीरा मंदिर परिसराच्या विकासाची […]
‘अटल’ ऑनलाइन नोंदणी प्रणालीमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
मुंबई : शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्याबरोबरच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा यासाठी ‘अटल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या विशेष उपक्रमात आतापर्यंत १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील […]
दक्षिण कोरियाच्या ‘एचएस ह्युसंग कंपनी’ची नागपूरमध्ये १ हजार ७४० कोटी रुपयांची गुंतवणूक
मुंबई : महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी यांच्या दरम्यान 1 हजार 740 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगन आणि एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सीआँग यांनी स्वाक्षरी केली. कंपनीने ही गुंतवणूक नागपूरच्या […]
प्रत्येक बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करावे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील सर्वच बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण (security audit) करण्यात यावे. तसेच बसस्थानक व आगारांमध्ये असलेल्या निर्लेखित बसेस व परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांचे १५ एप्रिलपर्यंत निष्कासन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावर असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही […]
अध्यापकांच्या भरती प्रकियेस मान्यता, नवीन कार्यपद्धतीचा होणार अवलंब
मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येण्यासाठी यापुढे राज्यात अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील […]










