Social Media Influencer Faisal Shaikh Detained By Mumbai Police
महाराष्ट्र मुंबई

सोशल मीडिया स्टार फैजल शेखला पोलिसांनी केली अटक

मुंबई : सोशल मीडिया स्टार फैजल शेख उर्फ फैजू याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. भरधाव कार चालवून अपघात केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जवळपास अडीच कोटींच्या घरात फॉलोअर्स असलेल्या फैजू याची कार एका सोसायटीच्या प्रवेशद्वाराला धडकून अपघात झाला आहे. फैजल हा त्याच्या काही सहकाऱ्यांसोबत ओशिवरातल्या मिलत नगर भागात कारने आला होता. भरधाव कारवरचा ताबा […]

Mumbai High Court rejects Anil Deshmukh's plea about Ed Summons In Money Laundering Case
महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! अनिल देशमुख पोहोचले ED कार्यालयात

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे समोर आले आहेत. देशमुख थेट सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) कार्यालयात पोहोचले आहेत. अनिल देशमुख हे सध्या मनी लॉण्ड्रिंग व खंडणी वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्याशिवाय, त्यांच्यावर मनी […]

anilkumar gaikwad retired as secretary public work department
महाराष्ट्र मुंबई

दोष नसतानाही माझ्यावर आलेली ‘ती’ वेळ कोणावरही येऊ नये – अनिलकुमार गायकवाड

मुंबई : दोष नसतानादेखील सलग २२ महिने मला सेवेतून बाजूला रहावे लागले, प्रशासनात माझी बाजू ऐकून घेतली गेली नाही, तरीही मी लढत राहिलो आणि निर्दोष बाहेर पडलो. परंतु, निर्दोष असतानाही ज्या यातना असतात या सबंधित व्यक्तीलाच माहित असतात, असे सांगतानाच माझ्यासारखी वेळ कुणावरही येवू देवू नका अशी खंत सार्वजनिक रस्ते व बांधकाम सचिव अनिलकुमार गायकवाड […]

Full support to Mumbai Cricket Association - Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र मुंबई

मुंबई क्रिकेट असोसिएशनला संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात आणि देशात उत्तम क्रिकेट खेळाडू निर्माण व्हावेत आणि त्यांनी आपल्या देशाचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रिकेटच्या विकासासंदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनला राज्य शासन पूर्णपणे सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री बोलत होते. वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते, ज्येष्ठ नेते खासदार […]

Government of Maharashtra
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील शासकीय, खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्यविषयक ऑन जॉब ट्रेनिंगची संधी

मुंबई : आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या 18 ते 45 वर्षे वयोगटातील युवक-युवतीना मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय व नामांकित खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्य क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमांमध्ये विनाशुल्क प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंगही देण्यात येणार असून या कालावधीत विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे […]

Good news for local commuters, big decision at cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

MPSC परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना ३० – ३१ ऑक्टोबरला लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार असून परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 30 व 31 ऑक्टोबरला लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी असे पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आले आहे. राज्य शासनाकडून मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात, परीक्षार्थी, […]

Transgender Persons should register on the portal, appeal of Mumbai Suburban District Collector Nidhi Chaudhary
महाराष्ट्र मुंबई

तृतियपंथीय व्यक्तींनी पोर्टलवर नोंदणी करून आपले अधिकार व हक्क यांचे जतन करावे

मुंबई : नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स (National Portal For Transgender Persons) या संकेतस्थळावर जास्तीत जास्त तृतीयपंथी व्यक्तींनी स्वतःहुन पुढे येऊन ऑनलाईन अर्ज भरावा, प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करून घेऊन आपले अधिकार व हक्क यांचे जतन करावे, असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर येथे जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या […]

nilam gorhe
महाराष्ट्र मुंबई

अत्याचार आणि हल्ल्यातील पीडित महिलांसाठी मनोधैर्य योजनेची आदर्श कार्यपद्धती तयार करा, डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई : महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ऍसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य तसेच पुनर्वसनासाठी राबविल्या जाणाऱ्या मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्र […]

Government of Maharashtra will provide Rs. 50 lakhs for the conservation of Jinji Fort
महाराष्ट्र मुंबई

जिंजी किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन ५० लाखाचा निधी देणार

मुंबई : जिंजी (तामिळनाडू) किल्यातील ज्या सदरेवरून राजाराम महाराजांनी स्वराज्याचा कारभार आठ वर्षे चालवला, त्या सदरेच्या जतन संवर्धनासाठी राज्य शासनामार्फत 50 लाख रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाच्या कामांचे सनियंत्रण करणाऱ्या सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. […]

No bail for Aryan, Arbaaz, Munmum; HC adjourns matter for tomorrow
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ज्येष्ठ वकील आणि भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात आर्यनचे प्रतिनिधित्व केले. या खटल्याच्या सुनावणीचा आज तिसरा दिवस होता. ड्रग्ज बस्ट प्रकरणी आर्यन ८ ऑक्टोबरपासून आर्थर रोड तुरुंगात बंद आहे. आर्यन खानला मुंबई कोर्टाने […]