Maharashtra Goods and Service Tax Department
अर्थकारण महाराष्ट्र मुंबई

वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जीएसटी चुकवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल, एकास अटक

मुंबई : वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने विशेष मोहीम कारवाई अंतर्गत खोटी देयके सादर करणाऱ्या विविध सहा कंपन्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाने दिली आहे. बनावट पावत्यांमध्ये सहभागी असलेल्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग […]

Union Minister Rane was speaking at the State Level Industry Conference held at World Trend Centre
महाराष्ट्र मुंबई

उद्योग व रोजगार वाढवण्याकरिता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर या संस्थेचे मार्गदर्शन महत्त्वाचे – केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबई : राज्यात उद्योग व रोजगार वाढविण्याकरिता महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर या संस्थेचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले. वर्ल्ड ट्रेंड सेंटर येथे आयोजित राज्यस्तरीय उद्योग परिषदेत केंद्रीय मंत्री राणे बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित […]

Eknath Shinde
कोल्हापूर महाराष्ट्र मुंबई

राधानगरी तालुक्यातील 9 सिंचन योजनांच्या खर्चावरील स्थगिती उठविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील विशेष भौगोलिक परिस्थिती पाहता ९ विविध योजनांच्या कामांसाठी ५८ कोटी रुपये खर्चास दिलेली स्थगिती उठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राधानगरी विधानसभा मतदार संघातील जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत सुमारे […]

Mantralaya Mumbai
महाराष्ट्र मुंबई

राष्ट्र पुरुष, थोर व्यक्तींची जयंती व राष्ट्रीय दिनाबाबत निर्देश; परिपत्रक जारी

मुंबई : राष्ट्र पुरुष / थोर नेत्यांची जयंती व राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम यावर्षी मंत्रालय व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकामध्ये दर्शविलेले जे कार्यक्रम सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी, शनिवारी व रविवारी येत असले तरी, ते कार्यक्रम त्या त्या दिवशी साजरे करण्यात यावेत. राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांच्या […]

A new growth center will be built in Chirle area of Raigad district – Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

रायगड जिल्ह्यातील चिर्ले परिसरात निर्माण होणार नवीन ग्रोथ सेंटर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम 84 टक्के पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामाध्यमातून रायगड जिल्ह्यातील चिर्ले जवळील पेण, पोयनाड परिसरात ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. लॉजिस्टिक्स पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या तीन बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार असून त्यामाध्यमातून याभागाचा सूनियोजितपणे विकास होईल, असा विश्वास […]

sudhir mungantiwar
महाराष्ट्र मुंबई

ज्ञान, विज्ञान आणि तंत्रशिक्षणात मातृभाषा आणि राष्ट्रभाषेचा उपयोग करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : मराठी ही आपली मातृभाषा आहे तर हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रशिक्षणात अधिकाधिक मातृभाषा आणि राष्ट्रभाषेचा उपयोग दैनंदिन वापरात करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आज सह्याद्री अतिथीगृह येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी हिंदी साहित्यिक डॉ. शीतलाप्रसाद दुबे आणि आनंद सिंह यांच्यासह […]

Bachchu Kadu fined Rs 20,000 for arguing with police 17 years ago
महाराष्ट्र मुंबई

बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अकोल्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू यांनी विविध राजकीय आंदोलनातील प्रकरणात जामीन अर्ज दाखल केला होता. आज गिरगाव न्यायालयाने तो फेटाळून लावला. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू […]

Planning should be done so that students are not inconvenienced in terms of hostels
महाराष्ट्र मुंबई

विद्यार्थ्यांची वसतिगृहाबाबत गैरसोय होणार नाही असे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना वेळेत वसतिगृह प्रवेश न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे वसतिगृहाच्या देखभाल, नूतनीकरण, दुरुस्ती अशा प्रशासकीय अडचणीमुळे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित रहाणार याची खबरदारी घेऊन वसतिगृहाच्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी कालबद्ध पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. मंत्रालयात मुंबईतील शासकीय वसतीगृह महाविद्यालय, संस्थाबाबत […]

Governor Minister US Consul attend First Interactive meeting of Universities in Maharashtra and US
महाराष्ट्र मुंबई शैक्षणिक

भारत आणि अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्याच्या दृष्टीने विचारमंथन आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : शिक्षणाला कोणत्याही भौगोलिक सीमा नसतात. शिक्षण हे जीवननिर्मित, मानवनिर्मित आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व निर्माण करणारे असावे. ऋग्वेदामध्ये सामूहिक मंथन आणि चिंतनाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये उच्च शैक्षणिक सहकार्याच्या दृष्टीने सातत्याने विचार मंथन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठे व अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्य […]

The beautification works of Mumbai should be completed by the Municipal Corporation in time - Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील वाहतूक बेटं, स्कायवॉक, रस्ते दुभाजक, पदपथ यांना मिळणार झळाळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले ‘हे’ निर्देश

मुंबई : मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी वाहतूक बेटं, दुभाजक, पदपथ, स्कायवॉक, समुद्र किनारे, उद्याने यांच्या सुशोभीकरणाची कामे मुंबई महापालिकेने वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुशोभीकरणाचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सादरीकरण केले. मुंबई महापालिकेच्या हद्दीत २०५० किमी लांबीचे रस्ते असून त्यामध्ये […]