World leaders including Putin, Trump, Netanyahu wish Modi on his birthday
ग्लोबल देश

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुतिन, ट्रम्प, नेतान्याहू यांच्यासह जागतिक नेत्यांकडून शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७५ वर्षांचे झाले. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक जागतिक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावावर भर दिला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आणि मॉस्को-नवी दिल्ली यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी मोदींच्या “प्रचंड वैयक्तिक योगदानाचे” कौतुक केले. क्रेमलिनच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित संदेशात […]

Vladimir Putin's India Visit in August 2025 Amid US-India Trade Tensions
ग्लोबल देश

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा भारत दौरा ऑगस्ट अखेरीस; जागतिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची भेट

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची माहिती रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्सने दिली आहे. ही माहिती भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या हवाल्याने गुरुवारी मॉस्कोमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. भारत-रशिया द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्वाची ठरणार आहे. डोभाल सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून तेथे विविध उच्चस्तरीय बैठकींना […]

Donald Trump speaking at a podium with Apple logo and Indian flag in the background, discussing Apple’s production plans in India and the U.S.
ग्लोबल देश

भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो, ॲपलने अमेरिकेत उत्पादन वाढवावे – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिका : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलच्या भारतातील वाढत्या उत्पादन योजनेवरून मोठे वक्तव्य केले आहे. दोहा येथून बोलताना ट्रम्प यांनी ॲपलचे CEO टिम कूक यांना थेट सल्ला दिला की, “भारतात कारखाना सुरू करू नका, अमेरिकेतच गुंतवणूक करा.” ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसाठी ही एक मोठी अडचण ठरू शकते. ट्रम्प म्हणाले, […]

Twenty-Two People Killed in Restaurant Fire in China's Luoyang City
ग्लोबल

चीनच्या लिओयांग शहरातील रेस्टॉरंटला भीषण आग, २२ जणांचा मृत्यू

चीन : मंगळवारी चीनच्या लिओनिंग प्रांतातील लिओयांग शहरात एका रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीत २२ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. याबाबत सरकारी शिन्हुआ वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. दुपारी १२:२५ वाजता ही आग लागली, आणि या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी तपास सुरू […]

Pope Francis dies at the age of 88
ग्लोबल

पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन

रोम : पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी रोम येथे निधन झाले, अशी माहिती व्हॅटिकनने सोमवारी अधिकृत व्हिडिओ निवेदनाद्वारे दिली. जागतिक रोमन कॅथोलिक चर्चचे प्रमुख आणि पहिल्या लॅटिन अमेरिकन पोप म्हणून इतिहासात स्थान मिळवलेले पोप फ्रान्सिस यांनी आज सकाळी ७:३५ वाजता आपल्या जीवनातील शेवटचा श्वास घेतला, असे जाहीर करण्यात आले. व्हॅटिकनच्या निवेदनानुसार, पोप फ्रान्सिस […]

Bodies of 11 Indians found in restaurant in Georgia
ग्लोबल देश

जॉर्जियातील रेस्टॉरंटमध्ये आढळले ११ भारतीयांचे मृतदेह, भारतीय दुतावासाकडून घटनेबाबत पुष्टी

जॉर्जिया : जॉर्जियातील गुदौरीच्या एका रेस्टाँरंटमध्ये ११ भारतीयांचे मृतदेह आढळून आले आहेत. भारतीय दुतावासाने या घटनेबाबत पुष्टी दिली आहे. जॉर्जियातील अंतर्गत मंत्रालयाच्या प्राथमिक तपासात कोणाच्याही शरीरावर जखमेची कोणतीही खून आढळून आलेली नाही. जॉर्जियाच्या स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले की, कार्बन मोनोक्साइडच्या विषबाधेमुळे हा मृत्यू झाला आहे. सर्व मृत व्यक्ती एकाच भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करत होत्या, ज्यांचे […]

ग्लोबल

बेशुद्ध महिलेवर तिचा मृत्यू होईपर्यंत बलात्कार, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

लंडनच्या एका पार्कमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, 35 वर्षीय मोहम्मद इडोवने एका महिलेवर वारंवार बलात्कार केला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही घटना पश्चिम लंडनच्या साउथॉल पार्कमध्ये घडली, जिथे 37 वर्षीय महिला नताली शॉटर रात्री बेंचवर बेशुद्ध पडलेली होती. या संधीचा फायदा घेत इडोएवने महिलेवर अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ही घटना 17 जुलै […]

Australian universities to open campuses in India soon - Margaret Gardner
ग्लोबल देश महाराष्ट्र मुंबई

ऑस्ट्रेलियन विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु करणार – मार्गारेट गार्डनर

मुंबई : भारतातून ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी मेलबर्न राजधानी असलेल्या व्हिक्टोरिया राज्यात येतात. आता ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे देखील लवकरच भारतात आपले कॅम्पस सुरु करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्याच्या गव्हर्नर प्रो. मार्गारेट गार्डनर यांनी दिली. गव्हर्नर प्रो. मार्गारेट गार्डनर यांनी व्हिक्टोरिया राज्याच्या एका शिष्टमंडळासह बुधवारी (दि. ६) महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन […]

Indian Student Stabbed In Head At US Gym, Dies
ग्लोबल देश

भयंकर! अमेरिकेतील जिममध्ये भारतीय विद्यार्थ्याच्या डोक्यात चाकूने वार, विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

अमेरिका : अमेरिकेतील इंडियाना राज्यातील फिटनेस सेंटरमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याच्या डोक्यात वार केल्याची भयंकर घटना घडली. या घटनेत वरुण नावाच्या विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागले. इंडियानामधील या दुःखद घटनेत, 29 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक जिममध्ये हल्लेखोर जॉर्डन अँड्राडे (24) याने वरुणच्या डोक्यात चाकूने वार केले होते. यात वालपरिसो विद्यापीठात संगणक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या वरुण राज पुचा […]

Decisions taken at the State Cabinet meeting
ग्लोबल महाराष्ट्र

मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र बहुउद्देशीय संकुल उभारणार

मुंबई : मॉरिशस येथे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी 8 कोटी रुपये खर्च येईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मॉरिशस दौऱ्यात मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीणकुमार जगन्नाथ यांच्याशी देखील चर्चा झाली होती. या पर्यटन केंद्रात पर्यटकांना माहितीशिवाय महाराष्ट्रातील आर्थिक […]