मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये एक भीषण अपघात झाला. बैतुल परासिया राज्य मार्गावर चालत्या कारला आग लागली, ज्यामध्ये चालकाचा वेदनादायी मृत्यू झाला. सुनील सिंदप्पा (वय ३९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सिंदप्पा हे पुण्यातील एका खाजगी कंपनीत अभियंता होते. सुनील एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी सासरच्या घरी मोतीवार्ड, बैतूल येथे गेले होते. हा अपघात […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
DGCA कडून विशेष दिव्यांग प्रवाशांबाबत मसुदा नियम जारी, इंडिगो वादानंतर घेतला निर्णय
नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक नियामक DGCA ने अलीकडेच विशेष दिव्यांग प्रवाशांबाबत विमान कंपन्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. इंडिगोने एका मुलाला रांची-हैदराबाद फ्लाइटमध्ये चढण्यास परवानगी नाकारली होती, कारण तो मुलगा घाबरलेला होता. या वादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. DGCA ने शुक्रवारी सांगितले की, जर एखाद्या विमान कंपनीला फ्लाइट दरम्यान विशेष दिव्यांग प्रवाशाची […]
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई : दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्याअनुषंगाने शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी सन २०२२ च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. या पुरस्कारासाठी https://nationalawardstoteachers.education.gov.in या वेब पोर्टलवर नावनोंदणी सुरू झाली आहे. या राष्ट्रीय पुरस्कारासाठी राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व […]
लोणी ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर विश्वविक्रमी रस्ता बांधकाम, जागतिक विक्रम करण्यासाठी सज्ज
अकोला : पुण्यातील पायाभूत सुविधा निर्माण क्षेत्रातील राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. दमदार कामगिरीसाठी ओळखली जाते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त असाच एक ऐतिहासिक, जागतिक विक्रम करण्यासाठी ती सज्ज आहे. बिटुमिनस काँक्रिटीकरणासह, जगातील सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोंद होण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. अमरावती ते अकोला या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग […]
ड्रायव्हिंग लायसन्स आता मिळणार ऑनलाईन, जाणून घ्या…
मुंबई : परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 115 सेवांपैकी ८० सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. आता परिवहन प्राधिकरण (आरटीओ) कार्यालयात वाहन चालक (लायसन्स) अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, दुय्यम वाहन चालक अनुज्ञप्ती, वाहन-चालक अनुज्ञप्तीमधील पत्ता बदल, दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्राचा पत्ता बदल तसेच बाहेरील राज्यात जाण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्रासाठी जावे लागणार नाही. आता या सहा सेवा […]
बुलडाण्यातील उंद्री गावाचे नाव आता उदयनगर, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मौजे उंद्री गावाचे नामकरण आता मौजे उदयनगर असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात याबाबत 31 मे 2022 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बद्दलची नोंद सर्व संबंधितांनी आपल्या राज्य शासकीय अभिलेखांमध्ये घ्यावी, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
अल्पवयीन मुलीवर मर्सिडीज कारमध्ये सामूहिक बलात्कार, गुन्हेगारांमध्ये हायप्रोफाईल नावांचा समावेश
हैदराबाद : मर्सिडीज कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. गुन्हेगारांमध्ये हायप्रोफाईल नावांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस तपास सुरु आहे. वृत्तानुसार, गुन्ह्यात सहभागी सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील पॉश एरिया ज्युबिली हिल्समध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर […]
तुर्कीने अधिकृतपणे बदलले नाव, तुर्की जागतिक मंचावर “तुर्किये” म्हणून संबोधले जाणार…
Turkey changes its name to Türkiye : तुर्कीने अधिकृतपणे नाव बदलून तुर्किये असे केले. तुर्कीने संयुक्त राष्ट्रांना कळवले आहे की, त्यांच्या अध्यक्षांच्या विनंतीनुसार, ते आतापासून सर्व भाषांमध्ये “तुर्किये” म्हणून संबोधले जाण्यास प्राधान्य देत आहे, याबाबत यूएनने गुरुवारी सांगितले. यूएनचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी एएफपीला ईमेलद्वारे सांगितले की, “बदल त्वरित आहे.” त्यांनी सांगितले की समायोजनाची मागणी […]
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, मायलेकीचा मृत्यू तर पितापुत्र गंभीर जखमी
पुणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर किवळे- देहूरोड परिसरात भीषण अपघात झाला आहे. एकाच कुटुंबातील चौघेजण दुचाकीवरून जात असताना कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देहूरोड किवळे ब्रिजवर दुचाकीला कंटेनरने मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की […]
ट्रेनने प्रवास करताना जास्त सामान घेऊन जाताय? भरावा लागेल दंड, जाणून घ्या नवीन नियम…
IRCTC Luggage New Rules : भारतीय रेल्वे आता मर्यादेपेक्षा जास्त सामान वाहून नेल्यास प्रवाशांना मोठा दंड आकारणार आहे. तसेच बुकिंग न करता अतिरिक्त सामान घेऊन जाताना पकडले गेल्यास, तुम्हाला आता सामान्य दराच्या सहा पट पैसे द्यावे लागतील. नियमांनुसार, प्रवासी ज्या श्रेणीत प्रवास करत आहेत, त्यानुसार रेल्वेच्या डब्यात 40 किलो ते 70 किलोपर्यंतचे वजनदार सामान प्रवासी […]










