मुंबई : ‘आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी ‘मला तुमचं ऐकायचंय…! आपण एकमेकांबद्दल बोलत असतो. आता एकमेकांशी बोलूया.., असं म्हणत एका विशेष […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन
जळगाव : पाळधी येथे महाराष्ट्रातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या 22 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. तसेच शासकीय विश्रामगृहाच्या नूतन इमारतीचे लोकार्पणदेखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. जळगाव जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेदेखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, […]
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालातील शिफारशींनुसार राज्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. कार्यगटाच्या सदस्यपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा मंत्र्यांचा समावेश आहे. राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात स्वायत्तता आणि उत्कृष्टता सक्षम करणे, शाळांपासून कौशल्य विकास तसेच उच्च आणि तांत्रिक शिक्षणापर्यंतच्या सर्व शैक्षणिक बाबींवर […]
तुम्हालाही आहे पोटावर झोपण्याची सवय? आरोग्यावर होतील गंभीर परिणाम, सविस्तर माहिती जाणून घ्या…
पुणे : अनेक जणांना पोटाच्या बाजूने झोपण्याची सवय असते. काही लोकांना त्यांच्या पोटावर झोपणे आवडते, परंतु ही स्थिती त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. जरी हे स्लीप एपनिया टाळण्यास आणि घोरणे कमी करण्यास मदत करत असले तरी, या स्थितीचा तुमच्या पाठीवर आणि मानेवर नकारात्मक प्रभाव पडतो. मग पोटावर झोपण्याची सवय वाईट आहे का? याचे उत्तर थोडक्यात […]
मराठा आरक्षणाबाबत चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. ही समिती […]
सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, कसे कळेल? जाणून घ्या सोपी पद्दत…
पुणे : आजच्या काळात गॅस सिलिंडर ही आपल्या मूलभूत गरजांपैकी एक गरज बनली आहे. विशेषत: शहरे आणि गावांमध्ये राहणारे लोक स्वयंपाकासाठी पूर्णपणे एलपीजी सिलिंडरवर अवलंबून आहेत. त्यामुळे अचानक सिलिंडरमधील गॅस संपून तुमची तारांबळ उडू नये, यासाठी काही उपाय करू शकता. त्यानुसार तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे आधीच कळू शकते आणि तुम्ही नवीन सिलेंडर […]
नारायण राणेंना न्यायालयाचा दणका, जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम दोन आठवड्यांत तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्याशिवाय, राणे यांना हायकोर्टाने 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणात सीआरझेड कायदा आणि एफएसआयचे उल्लंघन केल्याचे हायकोर्टाला आढळले आहे. दरम्यान, नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी […]
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे 62 टक्के काम पूर्ण, 2023 अखेर प्रकल्प पूर्ण होईल
मुंबई : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अर्थात मुंबई कोस्टल रोडचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षाअखेरीस हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबई कोस्टल रोडच्या प्रगतिपथावर असलेल्या कामाची पाहणी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा, राजपत्रित अधिकारी महासंघाचे होणारे ‘लक्षवेध दिन’ आंदोलन मागे
मुंबई : राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल शासन सकारात्मक असून जनतेला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा पुरविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर २७ सप्टेंबर रोजी पुकारलेले ‘लक्षवेध दिन’ आंदोलन मागे घेत असल्याचे महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने जाहीर केले आहे. महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी- कर्मचारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ […]
‘त्या’ हत्या प्रकरणाचे गूढ उकलले! पती अन् त्याच्या प्रेयसीने दिली होती हत्येची सुपारी
नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर गेल्या गुरुवारी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आलेल्या प्रियांका रावत यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रियांकाचा पती व त्याच्या प्रेयसीने सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रियांकाच्या पतीसह त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे. पनवेल तालुक्यातील विहीघर येथे राहणारी प्रियांका रावत […]










