नवी दिल्ली : पालकांकडून मुलाचा एक साधन म्हणून वापर केला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण अलीकडेच एका अपरिचित जोडप्यामधील कस्टडीच्या लढाईत दिल्ली न्यायालयाने नोंदवले आहे. मुलाशी संवाद साधल्यानंतर, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश अनिल कुमार यांच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आले की मुलावर आईचा प्रभाव आहे. न्यायाधीश अनिल कुमार यांनी आदेशात नमूद केले आहे कि, “मी मुलाशी संवाद साधला […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करावा – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई : सातारा जिल्ह्यातील कसणी गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील गाव आहे. या गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. मंत्रालयात मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री देसाई म्हणाले की, कसणी […]
नवीन वस्त्रोद्योग धोरणाबाबत वस्त्रोद्योग घटकांच्या मागण्यांना तत्वत: मान्यता
मुंबई : राज्य शासनाने नुकतेच राज्याचे पाच वर्षांसाठीचे नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. धोरण जाहीर झाल्यानंतर सहकारी सुतगिरण्या, यंत्रमाग आणि इतर घटकांच्या विविध मागण्यांना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज राज्यस्तरीय बैठक घेवून तत्वत: मान्यता दिल्याची माहिती त्यांनी दिली. या मागण्यांबाबत एकत्रित प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक […]
राज्यातील देवस्थानांवर महिलांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याबाबत विचार व्हावा, धर्मादाय आयुक्तांना सूचना
मुंबई : राज्यभरात असलेल्या विविध देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. विशेषत: पंढरपूर, एकवीरा देवी, तुळजापूर, अष्टविनायक अशा देवस्थानांमध्ये भाविकांसाठी सुविधा होणे अत्यावश्यक आहे. महिला भाविकांसाठी पायाभूत सुविधा करण्याची आवश्यकता नेहमीच भासते. प्रवास, निवास, हिरकणी कक्ष, सुलभ शौचालये, महिलांसाठी अनुषंगिक सुविधा यावर विचार करण्याची अजूनही गरज आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थानांच्या विश्वस्त समितीमध्ये योग्य प्रमाणात महिलांचा […]
अवैध मच्छिमार बोटी जप्त करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : अवैध मच्छिमारी करणाऱ्यांच्या नावा (बोटी) जप्त करून सरकारजमा केल्या जातील. तसेच अवैध मच्छिमारीला मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले जाईल, अशी घोषणा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. मच्छिमारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्री मुनगंटीवार यांनी मुंबई येथे विविध मच्छिमार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी पावसाळ्यातील […]
पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नव्हे, तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मुंबई : पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे जाऊन आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी केलेल्या व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा काल घेतला. तसेच वारकऱ्यांची संवादही साधला. यावेळी त्यांच्या लक्षात आले की पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांनी […]
शासकीय ई-बाजारात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी, विविध श्रेणीत राज्याला ५ ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार’ प्रदान
नवी दिल्ली : महाराष्ट्राने शासकीय ई-बाजार मध्ये लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत एकूण 5 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील वाणिज्य भवनमध्ये शासकीय-ई-बाजारपेठ (Government e Marketplace (GeM)) ला प्रोत्साहन देण्यासाठी ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार 2023’ प्रदान सोहळयाचे आयोजन सोमवारी सायंकाळी करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, […]
‘वंदे भारत एक्सप्रेस’मुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मडगाव (गोवा) – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर-दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी मडगाव ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर आज सायंकाळी वंदेभारत एक्सप्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज […]
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, संघामध्ये मोठे फेरबदल
नवी दिल्ली : विंडीजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत फक्त रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल. चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. अजिंक्य रहाणेकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), […]
पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2 महिलांची सुटका
पुणे : हिंजवडीत मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा यशस्वीपणे पर्दाफाश करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी युनिटला (AHTU) यश मिळाले आहे. 21 जून रोजी केलेल्या महत्त्वपूर्ण कारवाईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. कारवाईदरम्यान या बेकायदेशीर कृत्याला बळी पडलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली. मसाज सेंटरच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या […]










