मुंबई : दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन 2023 च्या शिक्षक पुरस्कारासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या पुरस्कारासाठी https://nationalawardstoteachers.education.gov.in या वेब पोर्टलवर नावनोंदणी सुरू झालेली असून इच्छुक शिक्षकांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी 15 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
वृद्धांची सुरक्षितता वाढवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन सुरू, पिंपरी चिंचवड पोलिसांचे महत्त्वपूर्ण पाऊल
पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस विभागाने ‘जेष्ठानुबंध’ ही नवीन हेल्पलाइन सेवा सुरू करून वृद्ध व्यक्तींची सुरक्षा वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या नेतृत्वाखालील, या 24/7 उपक्रमाचा उद्देश जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात, ज्यांची मुले परदेशात किंवा दूरवर राहतात आणि संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत करणे हा आहे. हेल्पलाइन सेवेची […]
चर्मोद्योग महामंडळांतर्गत एनएसएफडीसी कर्जाच्या रकमेत वाढ; ४८०० लाभार्थ्यांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील (चांभार, गोची, ढोर व होलार ) व्यक्तींच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी एनएसएफडीसी अर्थात राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाच्या योजनांसाठी चार हजार ८०० लाभार्थ्यांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट मिळाले आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक […]
तूर व उडीद डाळींचा अतिरिक्त साठा करण्यावर ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्बंध
मुंबई : डाळींसारख्या जीवनावश्यक वस्तूंची जास्त प्रमाणात दरवाढ होऊ नये, यासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या कलम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारात केंद्र शासनाच्या दि. २ जून २०२३ च्या अधिसूचनेन्वये डाळींच्या साठ्यावर (तूर व उडीद) घाऊक, किरकोळ व्यापारी, मिलर्स व इम्पोर्टर्स यांच्यावर ३१ ऑक्टोबर पर्यंत अतिरिक्त साठा करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूद्ध […]
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून
मुंबई : राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी, तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. विधानभवनात पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री […]
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रत्येक विभागाने सजगतेने, सतर्कतेने काम करावे – रूपाली चाकणकर
सांगली : महिलांवरील अत्याचार, बालविवाह, स्त्रीभृणहत्या रोखण्यासाठी प्रत्येक विभागाने सजगतेने व सतर्कतेने योगदान द्यावे, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, प्रभारी मुख्य कार्यकारी […]
शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले. काल सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे […]
फलकनुमा एक्स्प्रेसच्या चार डब्यांना भीषण आग, अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली…
तेलंगणा : तेलंगणामध्ये फलकनुमा एक्स्प्रेसच्या चार डब्यांना आग लागली. ही आगीची घटना यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यातील पागीदिपल्ली आणि बोम्मईपल्ली दरम्यान घडली. दरम्यान, सतर्क अधिकाऱ्यांनी तात्काळ ट्रेन तिथे थांबवली आणि प्रवाशांना खाली उतरवले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे चार बोगी जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बुलढाणा बस दुर्घटना : ड्रायव्हरच्या रक्तात आढळले 30% पेक्षा जास्त अल्कोहोल, फॉरेन्सिक अहवालात खुलासा
मुंबई : 1 जुलै रोजी समृद्धी एक्स्प्रेस वेवर अपघात झालेल्या बसमधील 25 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. घटनेच्या दिवशी ड्रायव्हरच्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेच्या 30 टक्क्यांहून अधिक होते. अधिकार्यांच्या मते 30% कायदेशीर अल्कोहोलचे प्रमाण खूप जास्त आहे आणि ते वाहन चालविण्यास धोकादायक आहे. दारूमुळे चालकाला तंद्री लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान […]
ब्रेकिंग! राहुल गांधींना मोठा धक्का, मोदी आडनाव प्रकरणात शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात उच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली : मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. यासोबतच राहुल गांधी यांनी केलेली शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकमधील एका सभेत राहुल गांधींनी ‘मोदी आडनाव’बाबत वक्तव्य केले होते. या […]










