पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग आज दुपारी 1 वाजता अधिकाऱ्यांनी बंद केला आहे. गेल्या काही तासांत पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे पाटबंधारे […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट ११ गावांतील मलवाहिन्या कामांच्या निविदांचे थर्ड पार्टी ऑडिट – मंत्री उदय सामंत
पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट ११ गावांमधील मलवाहिन्या विकसित करण्याच्या कामांच्या निविदांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ( सीओईपी) तज्ज्ञांमार्फत त्रयस्थ पद्धतीने लेखापरीक्षण केले जाईल, अशी माहिती, मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भीमराव तापकीर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री सामंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, पुणे मनपाच्या ११ समाविष्ट गावांमधील विविध […]
समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी सुविधांची संख्या वाढविणार – दादाजी भुसे
मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय येणाऱ्या काळात महामार्गावरील सुविधांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य सुनील केदार यांनी, या महामार्गावर झालेल्या अपघातासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री भुसे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले […]
परिवहन विभागाच्या वायूवेग पथकांमार्फत 14161 खासगी बसची तपासणी
मुंबई : राज्य शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बसची व अन्य गुन्ह्याबाबत तपासणीची मोहीम राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या माध्यमातून राबविण्यात आली. या मोहिमेत १४ हजार १६१ खासगी बसची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४,२७७ खासगी बस विविध नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्या आहेत. त्यांच्या तपासणीसाठी प्रतिवेदने निर्गमित करण्यात आली आहेत, […]
ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याचा सर्वांगीण विकास करणार, अजित पवार यांची माहिती
मुंबई : राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत पुरवणी मागण्या बहुमताने मंजूर करण्यात आल्या. पावसाळी […]
पुणे : खडकवासला धरणातून आज पाण्याचा विसर्ग सुरू होणार, नागरिकांसाठी ‘या’ आवश्यक सूचना
पुणे : पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे आज सायंकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सुरू होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनाने दिली आहे. खडकवासला धरण आज संध्याकाळपर्यंत १०० टक्के भरले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. खडकवासला धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग आज सायंकाळी ५ वाजल्यापासून १ हजार क्युसेकने सुरू होणार आहे. नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचा सल्ला […]
बसचा भीषण अपघात! ब्रेक फेल झाल्याने ५५ प्रवासी असलेली बस घाटात पलटी
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस राजूर घाटात पलटी झाली. बसमधून ५५ प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रवाशांमध्ये काही विद्यार्थ्यांचा समावेश असून अपघातात १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची […]
पुराचे पाणी घरात शिरल्याने झालेल्या नुकसानाबद्दल पाच हजारांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजारांची मदत
मुंबई : पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा पाच हजार रुपयांऐवजी प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत आणि विधानपरिषेदतही केली. राज्य आपत्ती प्रतिसाद मदत निधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदत अनुज्ञेय नसली […]
शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने विचार करावा, राज्यपालांची आरोग्य विभागाला सूचना
मुंबई : रुग्ण दगावला आणि शव नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध नसली, तर ग्रामीण भागात रुग्णाच्या नातलगांना नाईलाजाने शव उचलून न्यावे लागते. त्यामुळे राज्याने मृत व्यक्तींना नेण्यासाठी शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली. राज्यपाल बैस यांनी राजभवन येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक […]
महाराष्ट्र शासनाच्या नऊ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई : नऊ वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.३२ टक्के दराने विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम […]









