Chief Minister assure
महाराष्ट्र

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत

मुंबई : सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला असून नुकसानीसाठी प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव मदतीची आणि दुकानदार, टपरीधारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. […]

9 bills were passed in the winter session of the Legislature
महाराष्ट्र

गिरणी कामगारांना ठाणे जिल्ह्यात म्हाडामार्फत घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करुन घेणार – अतुल सावे

मुंबई : मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबई शहरात, उपनगरात जागा उपलब्ध नसल्याने सवलतीच्या दरात म्हाडामार्फत घरे बांधण्यासाठी ठाणे जिल्हयातील 43.45 हेक्टर शासकीय जमिनी विनामूल्य उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. या जमिनीपैकी 21.88 हेक्टर जमीन म्हाडामार्फत गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यास सुयोग्य आहे, असा अहवाल नुकताच ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाला असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री […]

Minister Atul Save
महाराष्ट्र मुंबई

शिवडी येथील चाळींच्या पुनर्विकासासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार – अतुल सावे

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत असलेल्या शिवडी येथील 12 चाळींच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली जाईल. त्यानंतर, केंद्र शासनाकडून या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली. सदस्य अजय चौधरी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री सावे म्हणाले की, म्हाडाने वास्तूशास्त्रज्ञ […]

9 bills were passed in the winter session of the Legislature
महाराष्ट्र

रिसोड येथे एमआयडीसी स्थापन करण्यासंदर्भात एक महिन्याच्या आत कार्यवाही

मुंबई : वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे एमआयडीसी स्थापन करण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही एका महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. सदस्य अमित झनक यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री सामंत म्हणाले की, एमआयडीसीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रात हे उद्योजकांना कमीत कमी दरात भूखंड उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हाधिकारी, वाशिम यांनी […]

crime
क्राईम देश

दिल्ली पुन्हा हादरली! तरुणीची भरदिवसा लोखंडी रॉडने वार करून हत्या, कॉलेजबाहेर घडली घटना

नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर भागात शुक्रवारी भरदिवसा एका मुलीची हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरातील कमला नेहरू कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर कॉलेजच्या बाहेर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली, ज्यात तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. […]

पुणे महाराष्ट्र

पुणे : फर्ग्युसन कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. ओम कापडणे (१९) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो बीएससीच्या तृतीय वर्षात शिकत होता. ओम नाशिकहून पुण्यात शिक्षणासाठी आलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ओम हा कॉलेजच्या आवारात असलेल्या विष्णू कुंज वसतिगृहात राहत होता. गुरुवारी (27 जुलै) त्याने वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली. दरम्यान, ही […]

Department of Social Justice and Special Assistance
महाराष्ट्र

दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण, जाणून घ्या महत्वाच्या बाबी…

मुंबई : राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद सांगली यांच्या अंतर्गत कार्यरत असणारी शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेला व संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाची मान्यता आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी या […]

All citizens of the state should register for 'Abha' card
महाराष्ट्र

राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करण्याचे आवाहन, ‘असे’ काढा आभा आरोग्य कार्ड

मुंबई : आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा) चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरु केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि ती ही […]

leopard attack on farmer
महाराष्ट्र

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानाची भरपाई वेळेत न दिल्यास संबंधितास दंड, पीडितास व्याज देणार

मुंबई : वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई 30 दिवसांत पीडितास न मिळाल्यास त्या रकमेवर व्याज देण्यात येईल आणि ते व्याज संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल केले जाईल. या विषयातील विधेयक विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. विधान परिषदेत हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकावर बोलतांना वनमंत्री मुनगंटीवार यांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानाच्या भरपाईत […]

Government of Maharashtra
महाराष्ट्र

भविष्य निर्वाह निधीचे वार्षिक विवरण पत्र सेवार्थ प्रणालीवर उपलब्ध

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त ज्यांचे भविष्यनिर्वाह निधी लेखा प्रधान महालेखाकार (ले.व ह.), महाराष्ट्र कार्यालयामधे ठेवले जातात, त्यांच्या भविष्य निर्वाह निधी लेख्यांचे वर्ष २०२२-२३ चे वार्षिक विवरण महाराष्ट्र शासनाच्या सेवार्थ पोर्टल वर अपलोड करण्यात आले आहे. पोर्टलवरील https://sevaarth.mahakosh.gov.in ह्या लिंक वर उपलब्ध मार्गदर्शिका पुस्तिकेत कर्मचारी त्यांचे वार्षिक विवरण पाहू शकतात, व प्रिंट करु […]