मुंबई : राज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे प्रभावी संरक्षण व संवर्धन व्हावे दृष्टीने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या संस्थेच्या सहकार्याने तातडीने योजना तयार करावी. तसेच जंगली म्हैस आणि लांडगा यांचेही संवर्धन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य वन्यजीव मंडळाचे उपाध्यक्ष तथा वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले. पुण्यातील भिडे वाडा येथे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले […]
पीक विम्याचा अग्रीम दिवाळी पूर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल – कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड : जिल्ह्यात पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा होईल असा शब्द मी आज देतो, अशा शब्दात कृषीमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना वचन यांत्रिक लाभ योजनेतील लाभ वितरण प्रसंगी दिले. जिल्हा विकासाच्या वाटेवर न्यायचा आहे हेच उद्दीष्ट ठेवून आपण काम करीत आहोत असेही ते यावेळी म्हणाले. येथील सामाजिक न्याय भवन परिसरात […]
समलैंगिक विवाहाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल – न्यायालय कायदे करू शकत नाही, सरकारने भेदभाव संपवावा
नवी दिल्ली : समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. CJI म्हणाले, न्यायालय कायदा करू शकत नाही, ते आमच्या अधिकारात नाही. परंतु न्यायालय कायद्याचा अर्थ लावू शकते. केंद्र आणि राज्य सरकारने भेदभाव संपवला पाहिजे. हे स्वाभाविक आहे. त्यांना संरक्षण द्यावे. समलिंगी समाजात भेदभाव केला जाऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, या […]
’अडॉप्ट अ स्कूल’ हा निर्णय शाळांच्या विकासासाठीच – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
पुणे : सामाजिक उत्तर दायित्व निधीचा उपयोग अनेक शाळांमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी यापूर्वीही करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर ‘अडॉप्ट अ स्कूल’ हा निर्णय केवळ शाळांमधील पायाभूत, शैक्षणिक सुविधांचा विकास करण्यासाठीच घेतलेला असून खासगीकरणाचा यात कोणताही संबंध नाही, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे ‘उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रम’ […]
नमो ११ कलमी कार्यक्रमात सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार, कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रम राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, या कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार करण्यात आला असून या कार्यक्रमातील समाविष्ट कामे, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या […]
भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारक जगभरातील महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला प्रेरणा देईल – अजित पवार
मुंबई : महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील ज्या भिडे वाड्यात महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, त्या भिडे वाड्यासंदर्भात त्या जागेत असणाऱ्या पोटभाडेकरुंची जागेसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. […]
लातूर : तावरजा कॉलनी गॅस स्फोटातील जखमींची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट
लातूर : येथील तावरजा कॉलनीत फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा रविवारी स्फोट होऊन यात फुगे विक्रेता ठार झाला आहे, तर ११ लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. ही घटना समजताच जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी रविवारी रात्री रुग्णालयात जाऊन रुग्ण आणि नातेवाईकांची भेट घेतली. जखमींवर योग्य त्या उपचाराबाबत […]
लेबनॉन आणि इस्रायलच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय शांती सेनेच्या जागेवर पडला रॉकेटचा शेल
इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारतीय शांती सेना लेबनॉन आणि इस्रायलच्या सीमेवर तैनात आहे, जिथे रात्री उशिरा रॉकेटचा शेल पडला. लेबनॉनमध्ये तैनात युनायटेड नेशन्स इंटरिम फोर्स (UNIFIL) ने या जागेवर रॉकेट शेल पडल्याची माहिती दिली आहे. UNIFIL चे प्रवक्ते आंद्रिया टेनेन्ती यांनी सांगितले की, UNIFIL शांतीरक्षक दल सध्या दक्षिण लेबनॉनमध्ये तैनात आहे. रविवारी रात्री एका जागेवर रॉकेटचा शेल […]
शेतरस्ते, पांदण रस्तेप्रश्नी तहसीलदारांनी आपल्या अधिकाराची काटेकोर अंमलबजावणी करावी – राधाकृष्ण विखे पाटील
नांदेड : कृषी क्षेत्राच्या विकासात लहान – मोठ्या रस्त्यांची सहज, सुलभ उपलब्धता ही अत्यंत आवश्यक बाब आहे. अनेक गावात एक-दोन शेतकऱ्यांच्या अडमुठेपणामुळे शेकडो शेतकऱ्यांना शेतासाठी मार्गच उरत नाही. शेतीच्या इतर प्रश्नासमवेत महसूल विभागाच्या दृष्टीने शेतरस्ते व पांदण रस्त्याची जबाबदारी तेवढीच महत्त्वाची असून वेळप्रसंगी तहसीलदारांनी आपल्याला मिळालेल्या न्यायालयीन अधिकाराची अधिक काटेकोर अमंलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश […]










