A rocket shell fell on an Indian peacekeeping force stationed on the border between Lebanon and Israel

लेबनॉन आणि इस्रायलच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय शांती सेनेच्या जागेवर पडला रॉकेटचा शेल

ग्लोबल देश

इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारतीय शांती सेना लेबनॉन आणि इस्रायलच्या सीमेवर तैनात आहे, जिथे रात्री उशिरा रॉकेटचा शेल पडला. लेबनॉनमध्ये तैनात युनायटेड नेशन्स इंटरिम फोर्स (UNIFIL) ने या जागेवर रॉकेट शेल पडल्याची माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

UNIFIL चे प्रवक्ते आंद्रिया टेनेन्ती यांनी सांगितले की, UNIFIL शांतीरक्षक दल सध्या दक्षिण लेबनॉनमध्ये तैनात आहे. रविवारी रात्री एका जागेवर रॉकेटचा शेल पडला. मात्र, आतापर्यंत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या घटनेनंतर लेबनीजचे पंतप्रधान नजीब मिकाती यांनी UNIFIL कमांडर-इन-चीफ जनरल अर्नोल्डो लाझारो यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी नाकौरा येथे संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याच्या स्थानावरील परिस्थितीबद्दल विचारले. मिकाती यांच्या कार्यालयातून या घटनेबाबत निवेदनही जारी करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, लेबनॉन युनिफिलशी पूर्णपणे एकजूट आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत