मुंबई : मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार योजनेची उच्च शक्ती प्रदत्त समितीची बैठक आज अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या दालनात झाली. बैठकीला अपर मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदी उपस्थित होते. बैठकीत मुंबई शहरासाठी एकूण २५२ कोटी रुपये इतक्या खर्चाच्या प्रकल्प अहवालास मान्यता मिळाली आहे. देशात महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाईन पद्धतीने भरावेत – मुंबई विभागीय मंडळ सचिव डॉ. सुभाष बोरसे
मुंबई : सन 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व माध्यमिक शाळाप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अर्ज नियमित शुल्कासह सरल डाटाबेसवरून सोमवार 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत भरावेत, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी […]
नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा : पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देवून या वर्षीच्या जुन अखेरपर्यंत पुरेल अशा पद्धतीने धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवावा त्याचबरोबर ठरल्याप्रमाणे पाण्याचे आर्वतन सोडण्यात यावे तुर्तासतरी या आर्वतनामध्ये बदल करु नये असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. तसेच नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा अनावश्यक वापर टाळावा, असे आवानही त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देसाई यांच्या […]
यवतमाळ जिल्ह्यात मोठे उद्योग प्रकल्प सुरु होणार – उद्योगमंत्री उदय सामंत
यवतमाळ : जिल्ह्यातील युवकांच्या हाताला काम व रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात मोठा उद्योग प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून हजारो कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात आढावा घेतला. या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी […]
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रुपयांचे ऑनलाईन वितरण
मुंबई : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख […]
भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष; कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांवर होणार कारवाई
मुंबई : सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न आस्थापनेची तपासणीची विशेष मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम डिसेंबरपर्यत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार उत्पादकांपासून ते किरकोळ दुकानांची तपासणी करण्यात येईल. ज्या मिठाईच्या दुकानांमध्ये अथवा उत्पादकांकडे कायद्यातील […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पांजली अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाबामहाराज यांच्या नेरुळ येथील निवासस्थानी भेट देऊन सातारकर यांची मुलगी, नातू यासह सातारकर कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री शिंदे यावेळी […]
वीर अमर जवानांच्या गावातील माती संकलित करणाऱ्या उमेश जाधव यांच्या उपक्रमाचे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून कौतुक
मुंबई : “देशातील १८५ वीर अमर जवानांच्या गावी जावून त्यांच्या अंगणातील पवित्र माती कलशात एकत्र करणाऱ्या व राष्ट्रभक्तीतून जगावेगळी धडपड करणाऱ्या उमेश गोपीनाथ जाधव या छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाचा उपक्रम अभिनंदनीय, प्रेरणादायी आणि अनुकरणीय असून “मेरी माटी, मेरी देश” या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभियानाला मिळत असलेला प्रतिसाद “राष्ट्र प्रथम” ही भावना जागृत करण्यास प्रेरक ठरत […]
जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षा एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. यासाठी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त संस्थांमधून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांनी नियमबाह्य कामे केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात […]
भयंकर! जन्मदात्या पित्याने घेतला दोन वर्षांच्या मुलाचा जीव, पत्नीने दारू पिण्यास नकार दिल्यामुळे…
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यात एका पित्याने आपल्या मुलाला जमिनीवर फेकून ठार मारले. पत्नीने पतीला दारू पिण्यास नकार दिल्यानंतर रागाच्या भरात पतीने हे भयंकर कृत्य केले. जन्मदात्या पित्याने आपल्या दोन वर्षांच्या मुलाला जमिनीवर फेकून ठार मारले. त्यानंतर आरोपी पिता फरार झाला. याप्रकरणी महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला […]










