BJP leader Radhakrishna Vikhe Patil
महाराष्ट्र शेती

महाराष्ट्र बोव्हाइन ब्रीडिंग अधिनियम करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि पशुपालक यांच्यासह एकूणच जनतेच्या सर्वांगीण हिताचा निर्णय घेत राज्य शासनाने पशुउत्पादकत्ता व गुणवत्तेत वाढ होण्यासाठी एक क्रांतिकारक पाऊल टाकले आहे. गाय व म्हशीमध्ये कृत्रिम रेतनाकरिता गोठीत वीर्य निर्मिती, प्रक्रिया, साठवण, विक्री, वितरण आणि प्रत्यक्ष कृत्रिम रेतन करणे, तसेच सहाय्यक पुनरुत्पादक तंत्र आणि या संबंधित सर्व बाबींसाठीचे नियमन करण्यासाठी राज्यात ‘महाराष्ट्र […]

colleges
महाराष्ट्र शैक्षणिक

बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यास सोमवार 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणारे नियमित विद्यार्थी, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व […]

Department of Social Justice and Special Assistance
महाराष्ट्र

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना १७०० कोटी रुपयांचे अनुदान

मुंबई : सामाजिक न्याय विभागाने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्ही योजनांच्या सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी १७०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. राज्यातील लाभार्थ्यांना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी रु. ६०० कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत रु. ११०० कोटी असा एकूण […]

Mumbai Municipal Corporation employees
महाराष्ट्र मुंबई

मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २६ हजार रूपये सानुग्रह अनुदान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीनिमित्त २६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्याचबरोबर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत गटविमा योजना लागू करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. वर्षा निवासस्थानी मुंबई महापालिकेच्या विविध कर्मचारी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे प्रधान […]

Statue of Chhatrapati Shivaji Maharaj near Indo-Pak Line of Control is an inspiration to soldiers – Chief Minister Eknath Shinde
देश महाराष्ट्र

भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असे सांगतानाच छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल. त्यांचे मनोबल उंचावत राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुपवाडा येथे व्यक्त केला. पुतळा अनावरणाच्या […]

Pune : Warje police recover 15 stolen laptops returned to owners
पुणे महाराष्ट्र

पुणे : चोरीला गेलेले 15 लॅपटॉप वारजे पोलिसांकडून जप्त, तिघांना अटक

पुणे : विद्यार्थ्यांच्या खोल्यांमधून चोरीला गेलेले 15 लॅपटॉप जप्त करण्यात वारजे पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना यश मिळाले आहे. अटक केलेला चोर अर्जुन तुकाराम झाडे (२२, रा. कर्वेनगर) याच्याकडून लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत प्रतीक मांडेकर आणि ऋषिकेश शिर्के यांना अटक करण्यात आली असून दोघेही मावळेआळी, कर्वेनगर येथील रहिवासी आहेत. यांच्याकडून चोरीच्या मौल्यवान वस्तू जप्त […]

Chandrakant Patil
महाराष्ट्र सोलापूर

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये होत आहे. या यात्रेसाठी पंढरपूर शहरात महाराष्ट्र राज्यासह व अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समिती व सीएसआर फंडातून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री […]

PCMC approves 850-bed hospital, load on YCM hospital will be reduced
पुणे महाराष्ट्र

पीसीएमसीकडून 850 खाटांच्या रुग्णालयास मंजूरी, वायसीएम रुग्णालयावरील भार होणार कमी

पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील गावांसाठी आरोग्य सेवा सुलभता वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मोशी येथे एक अत्याधुनिक रुग्णालय तयार करण्यात येणार आहे. महापालिकेने 15 एकर जागेवर आठ मजली रुग्णालयाच्या उभारणीला हिरवा कंदील दाखवला असून, त्यासाठी अंदाजे 450 कोटी रुपये खर्च येणार आहे. यशवंतराव चव्हाण मेमोरियल (वायसीएम) रुग्णालयावरील ताण कमी करण्याचे उद्दिष्ट यामागे आहे, […]

Resolve to keep the torch of victory burning throughout the year, Guardian Minister Sudhir Mungantiwar appeals to players
महाराष्ट्र

विजयाची मशाल वर्षभर धगधगती ठेवण्याचा संकल्प करा, सुधीर मुनगंटीवार यांचे खेळाडूंना आवाहन

चंद्रपूर : राज्याच्या एका टोकाला असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील छोट्याशा तालुक्यात आज राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा होत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र एवढ्यावरच न थांबता भविष्यात येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. आज पेटविलेली मशाल केवळ एका स्पर्धेपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक खेळाडूने वर्षभर विजयाची मशाल स्वत:च्या मनात धगधगती ठेवून उत्कृष्ट कामगिरी […]

Tourism development work in Nandurbar district should be accelerated
महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या कामांना गती द्यावी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाची मंजूर कामे लवकरात लवकर सुरु करावीत. तसेच जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या अनुषंगाने प्रलंबित कामांना गती द्यावी असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विभागाच्या कामांबाबत आढावा बैठक मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री डॉ. गावित म्हणाले की, पर्यटन […]