Underworld Don And Gangster Chota Rajan Shifted To Tihar Jail
कोरोना देश

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन कोरोनामुक्त, एम्समधून पुन्हा तिहार जेलमध्ये

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी त्याला एम्समधून सोडण्यात आले आणि पुन्हा तिहार तुरुंगात पाठविण्यात आले. छोटा राजन याला तिहारच्या जेल नंबर २ मध्ये कडक सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. 22 एप्रिलपासून राजन तुरुंगात रूग्णालयात उपचार घेत होता. परंतु, त्याची प्रकृती बिघडल्यानंतर 25 एप्रिल रोजी त्याला एम्समध्ये हलविण्यात आले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

7 मे रोजी उपचारादरम्यान छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे याच्या मृत्यूची अफवा पसरली होती. त्यानंतर तात्काळ एम्सने त्याचा इन्कार केला आणि ती केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं. अशाप्रकारे, मृत्यूच्या अफवेनंतर 4 दिवसांत छोटा राजनने कोरोनावर मात केली असून त्याला पुन्हा तिहार जेलमध्ये पाठविण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत