महाराष्ट्रात रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आह. त्यासोबतच राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या आरोग्य सुविधांची कमतरता देखील जाणवू लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात आज राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला.
राज्यात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी
- उद्या संध्याकाळपासून राज्यात १४४ कलम लागू
- अनावश्यक येणे जाणे पूर्ण बंद.
- कोणत्याही व्यक्तीला अतिआवश्यक काम नसेल तर बाहेर पडू देऊ नका.
- आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील
- सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच सुरु राहतील.
- सार्वजनिक वाहतूक सुरु राहील, ती केवळ जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांसाठीच असेल
- औषधे, लस उत्पादक, अत्यावश्यक सेवा देणारे, मास्क वितरक, वैद्यकीय लोक, जनावरांशी संबंधित दवाखाने उघडी राहतील
- पत्रकारांनाही सूट असेल.
- पेट्रोल पंप सुरु राहतील
- बांधकामं जिथे सुरु आहेत, तिथेच कर्मचाऱ्यांची राहण्याची सुविधा करा. त्यांना वाहतूक करु देऊ नका.
- हॉटेल, रेस्टॉरंटवर पूर्वीप्रमाणे निर्बंध, होम डिलिव्हरी सुरु
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनतेशी संवाद – LIVE https://t.co/CFhPVDEiS9
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2021




