गुजरातमधील सूरतच्या एका महाविद्यालयात शिकत असलेल्या दोन विद्यार्थिनींनी अंतराळात एक लघुग्रह शोधून काढण्याची किमया केलीये. हा लघुग्रह मंगळाच्या कक्षेत फिरणारा आहे. महत्त्वाचं म्हणजे नासाने देखील या मुलींच्या शोधाला दुजोरा दिलाय. या नव्या लघुग्रहाचे नाव HLV2514 देण्यात आलंय.
14 वर्षीय वैदेही बेकारिया आणि राधिका लखानी अशी या दोन विद्यार्थिनींची नावं आहेत. या दोघी अंतरिक्षात संशोधन करणाऱ्या नासाशी संबंधित आंतरराष्ट्रीय भारतीय लघुग्रह शोध मोहिमेशी संबंधित आहेत. या दोन विद्यार्थिनींनी आपल्या खगोलीय अभ्यासाचे प्रशिक्षण SPACE संस्थेत घेतलंय. नासाने इमेलच्या माध्यमातून यांच्या शोधाला दुजोरा दिलाय.
वैदेही आणि राधिका या दोघींच्या म्हणण्याप्रमाणे, आम्ही अंतरिक्षात सुमारे २० पदार्थांना चिन्हित केलेलं. त्यांपैकी हा एक लकी निघाला. सध्या आम्ही या लघुग्रहाला तात्पुरतं नाव दिलंय. त्याचं परिवलन पूर्ण झाल्यानंतर या लघुग्रहाला नाव देण्याची संधी आम्हाला मिळणार आहे.




