MPSC exam
काम-धंदा महाराष्ट्र

मोठी बातमी : MPSC परीक्षा पुढे ढकलल्या

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या रविवारी १४ मार्च २०२१ रोजी ही परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु, राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशांनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यासंदर्भात राज्य लोकसेवा आयोगाच्या सहसचिवांनी आज (११ मार्च) प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात सांगण्यात आले की आयोगाला राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून १० मार्च रोजी यासंदर्भातले निर्देश पत्राद्वारे कळवण्यात आले. त्यात म्हटलं होतं कि, राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी वेगवेगळे निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित करणे योग्य नसल्याचे त्यात स्पष्ट केले आहे.

ज्या उमेदवारांनी MPSC भरती परीक्षेसाठी (MPSC Recruitment Examination) अर्ज केला होता, ते उमेदवार अधिक माहितीसाठी mpsc.gov.in वर भेट देऊ शकतात.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत