पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांना आज (गुरुवार) कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. स्वत: पंतप्रधान मोदींनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले कि, “माझ्या आईला आज कोरोना लसचा पहिला डोस दिला गेला, हे सांगताना मला आनंद होत आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपल्या सभोवतालच्या लस घेण्यास पात्र असलेल्या लोकांना मदत करा आणि लस घेण्यास प्रेरित करा.”
Happy to share that my mother has taken the first dose of the COVID-19 vaccine today. I urge everyone to help and motivate people around you who are eligible to take the vaccine.
— Narendra Modi (@narendramodi) March 11, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन गुजरातच्या अहमदाबाद येथे राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. पंतप्रधान मोदींना 1 मार्चला दिल्लीतील एम्समध्ये कोरोना लस देण्यात आली होती.




