Husband attacked his wife out of suspicion of character
देश

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केले अतिशय भयंकर कृत्य…

मध्य प्रदेश : पतीने आपल्या पत्नीच्या हाताचा पंजा आणि पायाचा तळवा धारदार शस्त्राने कापल्याची अतिशय भयंकर घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून या व्यक्तीने हे भयंकर कृत्य केले. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोपाळमध्ये निशातपुरा हद्दीत काल (मंगळवार) रात्री ही घटना घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम राजपूत हा आपल्या सात वर्षीय मुलासोबत भोपाळमधील विश्वकर्मा नगरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याची पत्नी संगीता (26) इंदूरमध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. ती जमेल त्याप्रमाणे १५ दिवसांत किंवा महिनाभराने आपल्या भोपाळ येथील घरी येत होती. मात्र, तिने दर आठवड्याला घरी यावे, असा तिचा पती प्रीतम याचा आग्रह होता. यावरून तो तिचा मानसिक छळ करत होता. तसेच तिच्या चारित्र्यावर संशयही घेत होता.

दरम्यान, काल संगीता घरी आली होती. रात्री साडेअकराच्या सुमारास ती आणि तिचा मुलगा घरात झोपले होते. त्यावेळी तिचा नवरा प्रीतम दारूच्या नशेत घरी आला. संगीताला झोपलेलं पाहून त्याला राग अनावर झाला आणि त्याने धारदार शस्त्राने संगीताच्या हाताचा पंजा आणि पायाचा तळवा कापला. त्यानंतर देखील तो वार करत होता. या प्रकारामुळे जखमी महिला आणि घाबरलेल्या मुलाने ओरडायला सुरुवात केली. त्यांच्या किंचाळ्या ऐकून शेजारी धावत आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलीस घटनास्थळी पोहोचले असता आरोपी प्रीतमने पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ त्याला पकडले आणि तातडीने जखमी झालेल्या संगीताला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आरोपी प्रीतम याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत