corona vaccination dgca guideline for pilots and cabin crew
कोरोना देश

वैमानिक कोरोना लसीकरणानंतर 48 तास विमानात बसणार नाहीत, DGCA कडून गाईडलाईन्स जारी

नागरी उड्डाण संचालनालय अर्थात डीजीसीए (DGCA) कडून कोरोना लसीकरणासंदर्भात गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. DGCA ने मंगळवारी सांगितले की पायलट आणि केबिन क्रू सदस्य कोरोना लसीकरणानंतर 48 तास विमानात बसणार नाहीत, लसीकरणानंतर 48 तासांनंतर त्यांना कोणतेही साईड इफेक्ट न झाल्यास ते आपली सेवा पुन्हा सुरू करू शकतील.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

डीजीसीएने सांगितले की, लस घेतल्यानंतर 30 मिनिटे हवाई दलाच्या कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवले जाईल. लस घेतल्यानंतर 48 तासांपर्यंत हवाई दलातील सदस्यांनी विमानाने उड्डाण करणे वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य ठरेल. वैमानिकांना लस घेतल्याच्या 48 तासांनंतर कोणतेही साईड इफेक्ट जाणवल्यास त्यावर डॉक्टर समीक्षा आणि उपचार करतील.

डीजीसीएने म्हटले आहे की अशा वैमानिकांना उड्डाण कर्तव्यासाठी तंदुरुस्त घोषित केले जाईल, ज्यांना औषधोपचाराविना कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळणार नाहीत. तसेच त्यांच्याकडे याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच जर लसीकरणानंतर 14 दिवसानंतरही कुणाची तब्येत खराब राहिल्यास त्यांना फिटनेस निश्चित करण्यासाठी ‘खास वैद्यकीय तपासणी’ आवश्यक असेल.

16 जानेवारीपासून भारताने मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत 2 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात, केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांना कोरोना लस दिली गेली होती, परंतु आता दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जात आहे. तसेच ४५ वर्षांच्या पुढील गंभीर आजार असलेल्यांना लस दिली जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत