narendra modi with uddhav thackeray
महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छांबद्दल मानले नरेंद्र मोदींचे आभार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांकडून त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून उद्धव ठाकरे यांनीही त्याबद्दल आभार मानले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. उद्धव ठाकरे यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो”.

उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छांबद्दल नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “नरेंद्र मोदीजी तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार. तुमच्या मार्गदर्शन आणि नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र आगामी वर्षांमध्ये देशाच्या विकासात महत्त्वाचं योगदान देईल याचा मला विश्वास आहे”.

यंदा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला असून यासंदर्भात त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटवरुन माहिती दिली होती. कार्यकर्त्यांना आवाहन करताना, शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानावर गर्दी करु नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. तसंच आपल्या वाढदिवशी आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान, प्लाझ्मा दान शिबीरांचं आयोजन करावं. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीला सढळ देणगी द्यावी असंही ठाकरे म्हणाले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत