Fire engulfs Taloja MIDC, spreads to surrounding companies
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : तळोजा एमआयडीसीत आगीने घेतलं रौद्ररूप, आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये पसरली आग

मुंबई : नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीत भीषण आग लागली आहे. ह्या आगीची भीषणता वाढली असून बाजूच्या दोन कंपन्यादेखील या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या आहेत. आग रौद्ररूप घेत असून परिसरात घबराट पसरली आहे. सध्या अग्निशमन दलाची टीम आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीत फार्मा कंपन्यांना लागणारं सॉल्व्हन्ट ऑइल तयार होत असल्याची माहिती आहे. बाजूच्या एका कंपनीत ७० टन तेलाचा साथ आहे. खबरदारीचा उपाय म्हणून येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. आग पसरत असल्यामुळे चिंता वाढत आहे. अग्निशमन दलाच्या आणखी गाड्यांना बोलवण्यात आलं आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी आणण्यात आलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत