प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारावरून बुधवारी कॉंग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. कॉंग्रेसने म्हटले आहे की हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे आणि अमित शहा यांना त्वरित गृहमंत्रीपदावरून काढून टाकले पाहिजे. गृहमंत्री उपद्रव करणाऱ्यांचा शोध घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरले.
कॉंग्रेसचे नेते आणि पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी दिल्लीतील हिंसाचारावर म्हटले की ते गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे आणि अमित शाह यांना त्वरित त्यांच्या पदावरून काढून टाकले पाहिजे. राजधानी दिल्लीत गेल्या एका वर्षात हिंसाचाराची ही दुसरी घटना आहे. दिल्लीतील शेतकरी चळवळीच्या आडून झालेल्या नियोजित हिंसाचार आणि अराजकतेसाठी गृहमंत्री थेट जबाबदार आहेत. खुपिया इनपुट असूनही, हिंसाचार थांबविण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांना एका क्षणासाठीही पदावर राहण्याचा अधिकार नाही.
शाह यांना त्वरित काढून टाकण्याची मागणी करताना सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधान (नरेंद्र मोदी) यांनी त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई न केल्यास ते अमित शहा यांना संरक्षण देत असल्याचे सिद्ध होईल. ते म्हणाले की, उपद्रव करणाऱ्यांना लाल किल्ल्यात जाण्याची परवानगी दिली होती.
हिंसाचाराच्या आरोपींपैकी एक असलेल्या दीप सिद्धूबद्दल कॉंग्रेसने म्हटले की दीप याची भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी जवळीक होती आणि काल तो लाल किल्ल्यावर उपस्थित होता. कॉंग्रेसने म्हटलं कि शेतकरी संघटना आणि त्यांचे आंदोलन बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. जर त्यांना यांच्या योजनेची माहिती होती तर त्यांना लाल किल्ल्यात प्रवेश का देण्यात आला?
कानून व्यवस्था और खुफिया तंत्र की नाकामी के लिए गृहमंत्री अमित शाह बर्खास्त हों!
उपद्रवियों की अगुवाई कर रहे अवांछित तत्वों पर मुकदमे दर्ज न कर किसान मोर्चा नेताओं पर मुकदमे दर्ज करने ने मोदी सरकार-उपद्रवियों की मिलीभगत व साजिश को बेनकाब किया।
हमारा बयान-: pic.twitter.com/IJXU3MKK3D
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) January 27, 2021




