Old notes of Rs 100, 10 and 5 will be withdrawn, RBI said
देश

100, 10, 5 च्या जुन्या नोटा चलनातून होणार बाद, RBI ने दिली माहिती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार 100, 10, 5 च्या सर्व जुन्या नोटा मार्च-एप्रिलनंतर चलनात नसणार आहेत. या जुन्या नोटा मागे घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. मार्च किंवा एप्रिलपर्यंत आरबीआय १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी सांगितलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बी. महेश यांच्या म्हणण्यानुसार, मार्च-एप्रिलपर्यंत चलनातील जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर पडतील. वास्तविक, 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याच्या अगोदरच नवीन नोटा चलनात आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2019 मध्ये 100 रुपयांची नवीन नोट चलनात आणली होती. आरबीआय अचानक कोणतीही जुनी नोट बंद करू इच्छित नाही, तर प्रथम त्याची नवीन नोट बाजारात चलनमध्ये आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील असे आरबीआयचे म्हणणे आहे.

१० रुपयांचं नाणं आणून १५ वर्ष झाल्यानंतरही व्यापारी आणि उद्योजकांनी त्याचा स्वीकार न करणं बँका आणि आरबीआयसाठी मोठी समस्या झाली आहे. यावेळी त्यांनी नाण्याच्या वैधतेसंबंधी अफवा पसरत असून लोकांना याबद्दल जागरुक करण्याची गरज असल्याचं म्हटलं. लोकांनी १० रुपयांचं नाणं जास्तीत जास्त वापरावं यासाठी बँकांनी मार्ग शोधण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत