Atmanirbhar Bharat : Ban on selling imported goods in Army canteen
देश

आत्मनिर्भर भारत : लष्कराच्या कॅन्टीनमध्ये इम्पोर्टेड वस्तूंच्या विक्रीवर बंदी

केंद्र सरकारने देशात असलेल्या 4 हजार लष्कराच्या कॅन्टीन्सला परदेशी वस्तूंची आयात न करण्याचे आदेश दिले आहेत. यात महागड्या विदेशी मद्याचा देखील समावेश आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयापूर्वी तीनही सैन्यदलांशी या संदर्भात चर्चा करून सल्ला घेण्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार देशात सुमारे चार हजार लष्कराच्या कॅन्टीन आहेत. ह्या कॅन्टीनमध्ये सूट दरावरील वस्तूंचा समावेश असतो. ज्याचा फायदा विद्यमान आणि माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना होतो. परदेशी मद्य आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी सहसा जास्त असते.

सरकारच्या निर्णयानंतर परदेशी वस्तू आता सैन्याच्या कँटीनमध्ये विकल्या जाणार नाहीत. आर्मी कॅन्टीन ही देशातील सर्वात मोठी रिटेल साखळी आहे. दरवर्षी यात सुमारे 200 कोटी रुपयांची उलाढाल होते. कॅन्टीनमध्ये विकल्या जाणाऱ्या उत्पादनांपैकी सुमारे 7% उत्पादने आयात केली जातात. यामध्ये डायपर, व्हॅक्यूम क्लीनर, हँडबॅग आणि लॅपटॉप यासारख्या वस्तू चीनमधून आयात केल्या आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत